सतत वाढत्या वजनाची समस्या आजकाल सगळ्यांनाच सतावत आहे. वजन वाढीची ही समस्या सध्या इतकी कॉमन होत जात आहे की, प्रत्येकालाच आपलं वाढलेल वजन कमी व्हावं असं वाटत. वजन कमी करण्यासाठी आपण जिमपासून डाएटपर्यंत सर्व उपाय करतोच. सोबतच, या उपायांबरोबर आपण आणखी काही घरगुती उपाय (Miracle Powder for Quick Weight Loss) देखील करुन पाहतो. या लहान - मोठ्या घरगुती उपायांमुळे देखील वजन झटपट (Miracle Spice For Weight Loss) कमी होण्यास मदत होते. या घरगुती उपायांमध्ये, वजन कमी करण्यासाठी काहीजण लिंबू, मधाचे पाणी घेतात तर काहीजण मेथीदाणे खातात. यासोबतच कुणी दालचिनी, लवंगाचे पाणी पितात, तर कुणी चिया सीड्स खाणे पसंत करतात. यासारखाच अजून एक उपाय म्हणजे रोजच्या डाएट आणि एक्सरसाइज सोबत डेली रुटीनमध्ये काही खास निवडक मसाल्यांची आयुर्वेदिक घरगुती पावडर खाणे(Best Herbs and Spices For Weight Loss).
डाएटिशियन अनुशी जैन यांनी इंस्टाग्राम वरील dt.anushijain या त्यांच्या अकाऊंटवरून वजन कमी करण्यासाठी एका खास आयुर्वेदिक पावडरची रेसिपी शेअर केली आहे. आपल्या रोजच्या मसाल्यांच्या डब्यांतील काही निवडक मसाले घेऊन आपण त्यांची एक आयुर्वेदिक औषधी पावडर घरच्या घरीच तयार करु शकतो. रोजचे डाएट आणि एक्सरसाइज सोबतच आपण ही आयुर्वेदिक पावडर खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
साहित्य :-
१. जिरं - ५० ग्रॅम
२. बडीशेप - ५० ग्रॅम
३. ओवा - ५० ग्रॅम
४. धणे - २० ग्रॅम
५. अळशी - १० ग्रॅम
६. हिंग पावडर - १/४ टेबलस्पून
वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...
काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...
अशी तयार करा आयुर्वेदिक पावडर...
सगळ्यात आधी एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये जिरं, बडीशेप, ओवा, धणे, अळशी असे सगळे जिन्नस एकत्रित घ्यावेत. त्यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर हे सगळे जिन्नस एकत्रित भाजून घ्यावेत. सगळे जिन्नस हलकेच भाजून झाल्यावर त्यात सगळ्यात शेवटी हिंग पावडर घालावी. मग पुन्हा १ ते २ मिनिटे सगळे जिन्नस भाजून घ्यावेत. त्यानंतर हे भाजलेले जिन्नस एका डिशमध्ये काढून थंड करावेत. थंड झाल्यानंतर हे सगळे जिन्नस एकत्रित एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ओतून, मिक्सर फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. तयार पावडर एका काचेच्या हवाबंद बरणीत भरुन ठेवावी.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने खा पावडर...
दिवसांतून ३ वेळा आपण ही पावडर पाण्यासोबत खाऊ शकता. पाण्यांत ही पावडर घालून ते पाणी देखील पिऊ शकता किंवा चमचाभर पावडर खाऊन मग वर पाणी पिऊ शकता.
आयुर्वेदिक पावडर वजन कमी कसे करते?
डाएटिशियनच्या मते, आयुर्वेदात जिरं, ओवा, बडीशेप, हिंग या मसाल्यांचा वापर होतोच. या गोष्टींचे मिश्रण अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे पाचन तंत्र निरोगी ठेवण्यासोबत, गॅस्ट्रिकसारखी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. हे मसाले शरीरातील चयापचय योग्य ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या मसाल्यांमधील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे पोट भरल्यासारखे वाटते. यासोबतच, भूक नियंत्रित करण्यास मदत होते. ज्यामुळे कॅलरी इनटेक कमी प्रमाणांत होतो, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.