Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > बाळंतपणानंतर कियारा अडवाणीने केलं जबरदस्त वेट लॉस, तिची डायटिशियन म्हणते फक्त ३ चुका टाळा-वजन घटेलच

बाळंतपणानंतर कियारा अडवाणीने केलं जबरदस्त वेट लॉस, तिची डायटिशियन म्हणते फक्त ३ चुका टाळा-वजन घटेलच

Weight Loss Tips: वेटलॉस करत असाल तर कियारा आडवाणीच्या डाएटिशियनने दिलेला हा सल्ला एकदा नक्की वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 16:32 IST2026-01-29T09:37:52+5:302026-02-02T16:32:33+5:30

Weight Loss Tips: वेटलॉस करत असाल तर कियारा आडवाणीच्या डाएटिशियनने दिलेला हा सल्ला एकदा नक्की वाचा...

Kiara Advani’s Nutritionist Says Avoid These Common Mistakes in your weight loss journey | बाळंतपणानंतर कियारा अडवाणीने केलं जबरदस्त वेट लॉस, तिची डायटिशियन म्हणते फक्त ३ चुका टाळा-वजन घटेलच

बाळंतपणानंतर कियारा अडवाणीने केलं जबरदस्त वेट लॉस, तिची डायटिशियन म्हणते फक्त ३ चुका टाळा-वजन घटेलच

वाढत्या वजनाची चिंता सध्या अनेकांना भेडसावते आहे. वाढलेलं वजन कमी कसं करायचं किंवा आहे ते वजन कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं हा प्रश्न सध्या खूप लोकांना छळत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो आहे. आता वजन कमी करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सध्या ॲण्टी इन्फ्लामेटरी डाएट करत आहेत. हे डाएट म्हणजे शरीरावर आलेली सूज कमी करण्यासाठीचं डाएट. यामुळे आपोआपच मग वेटलॉस होण्यास मदत होते. पण हे डाएट करत असताना काही चुका टाळणं खूप गरजेचं आहे. अन्यथा वजन अजिबातच कमी होणार नाही. त्या चुका कोणत्या याविषयीची माहिती अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्या डाएटिशियनने शेअर केली आहे.(Kiara Advani’s Nutritionist Says Avoid These Common Mistakes in your weight loss journey)

वेटलॉस करणाऱ्यांनी कोणत्या चुका टाळायला हव्या?

 

निकोल या कियारा आडवाणीसह बॉलीवूडमधील कित्येक स्टार्सच्या आहारतज्ज्ञ आहेत. एवढंच नाही तर त्या अनेक क्रिकेटर्सलाही आहार, फिटनेस याविषयी गाईड करतात. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जेव्हा तुम्ही कोणतंही डाएट करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर उत्तम परिणाम दिसून येण्यासाठी काही चुका टाळायला हव्या. त्यापैकी काही चुका बहुतांश लोक करतात आणि त्या चुका म्हणजे चहा किंवा कॉफी यांचं गरजेपेक्षा जास्त सेवन करणे, रोज रात्री अपुरी झोप घेणे याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

याशिवाय पॅकेज फूड, सोयाबीन, सुर्यफूल, सॅफ्लॉवर अशा तेलांमध्ये शिजवलेले अन्न खाणे, अल्कोहोल घेणे यासारख्या गोष्टीही वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. दिवसाची सुरुवात उपाशीपोटी कॉफी घेऊन करणेही खूप चुकीचे आहे. यामुळे कॉर्टीसॉल हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि ते वजनवाढीसाठी कारणीभूत ठरते

 

वेटलॉस करणाऱ्यांनी आणखी एक महत्त्वाची चूक टाळायला हवी आणि ती म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेचच झोपणे. रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यामध्ये ३ ते ४ तासांचा गॅप असायला हवा. 

याशिवाय जेव्हा तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असतात, खूप घाईघाईत असता तेव्हा खाणं टाळायला हवं. कारण त्या अन्नाचेही व्यवस्थित पचन होत नाही आणि शरीरावरची चरबी वाढविण्यासाठी ते कारणीभूत ठरते.  
 

Web Title : कियारा आडवाणी की पोषण विशेषज्ञ ने साझा किए वेट लॉस टिप्स: ये गलतियाँ टालें।

Web Summary : कियारा आडवाणी की पोषण विशेषज्ञ ने चाय/कॉफी का अधिक सेवन, अपर्याप्त नींद, प्रोसेस्ड फूड और देर रात के खाने जैसी सामान्य वेट लॉस गलतियों से बचने की सलाह दी है। तनाव में खाने और रात के खाने और नींद के बीच अंतर न रखने से भी नुकसान होता है।

Web Title : Kiara Advani's nutritionist shares weight loss tips: Avoid these mistakes.

Web Summary : Kiara Advani's nutritionist advises avoiding common weight loss mistakes like excessive tea/coffee, insufficient sleep, processed foods, and late dinners. Stress eating and skipping the gap between dinner and sleep are also detrimental.