Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > करिना कपूरच्या डायटिशियनचा सल्ला-पोट भरेल पण वजन वाढणार नाही अशी भन्नाट युक्ती-जेवा पोटभर

करिना कपूरच्या डायटिशियनचा सल्ला-पोट भरेल पण वजन वाढणार नाही अशी भन्नाट युक्ती-जेवा पोटभर

Indian traditional diet for weight loss: Celebrity nutritionist weight loss hacks: आपल्यालाही जेवणाचा आनंद घेत वजन कमी करायचे असेल आणि ओव्हरईटिंगवर कायमचा ताबा मिळवायचा असेल, तर त्यांचा हा 'सिक्रेट फॉर्म्युला' आपल्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2026 09:30 IST2026-03-19T09:30:00+5:302026-03-19T09:30:02+5:30

Indian traditional diet for weight loss: Celebrity nutritionist weight loss hacks: आपल्यालाही जेवणाचा आनंद घेत वजन कमी करायचे असेल आणि ओव्हरईटिंगवर कायमचा ताबा मिळवायचा असेल, तर त्यांचा हा 'सिक्रेट फॉर्म्युला' आपल्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

Kareena Kapoor Khan weight loss diet Rujuta Diwekar weight loss secret for celebrities Eat more weigh less tips Marathi How to lose weight without starving Kareena Kapoor's daily diet routine | करिना कपूरच्या डायटिशियनचा सल्ला-पोट भरेल पण वजन वाढणार नाही अशी भन्नाट युक्ती-जेवा पोटभर

करिना कपूरच्या डायटिशियनचा सल्ला-पोट भरेल पण वजन वाढणार नाही अशी भन्नाट युक्ती-जेवा पोटभर

बॉलीवूडची 'बेबो' म्हणजेच करीना कपूर खान तिच्या फिटनेस आणि झिरो फिगरसाठी कायमच चर्चेत असते. दोन मुलांची आई असूनही करीना आजही तितकीच फिट आहे. अनेकांना वाटते की करीना फक्त फॅन्सी डाएट किंवा तासनतास जिममध्ये घाम गाळून स्वतःला फिट ठेवते.(Indian traditional diet for weight loss:) पण खरंतर, तिच्या फिटनेसचे सर्वात मोठे श्रेय तिच्या 'डाएटिशियन ऋजुता दिवेकरला जाते, जी तिला कोणत्याही स्ट्रिक डाएटशिवाय 'गिल्ट-फ्री' जेवण्याचा सल्ला देते. (Celebrity nutritionist weight loss hacks)
अनेकांना जेवताना स्वतःवर ताबा राहत नाही आणि आपण 'ओव्हरईटिंग' करतो. यामुळे वेगाने आपलं वजन वाढते. पण करीना कपूरची डायटिशियन ऋजुता दिवेकर यांच्या मते, वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर 'योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने' खाणे आहे. (Rujuta Diwekar weight loss secret for celebrities) जर आपल्यालाही जेवणाचा आनंद घेत वजन कमी करायचे असेल आणि ओव्हरईटिंगवर कायमचा ताबा मिळवायचा असेल, तर त्यांचा हा 'सिक्रेट फॉर्म्युला' आपल्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. 

जपानी स्त्रियांच्या लांब केसांचे सिक्रेट! तांदळाचा खास पॅक; केसगळती थांबेल, कोंडा होईल कमी- १५ दिवसांत पाहा जादू

ऋजुता दिवेकर यांना ओव्हरईटिंग थांबवण्यासाठी जॉर्डन फॉर्म्युला सुचवला आहे. त्या म्हणतात की आपल्यालाही विचार न करता खाण्याची सवय असेल तर जॉर्डन फॉर्म्युला मदत करु शकतो. यामुळे आपल्या मनात कोणतीही अपराधीपणाची भावना येणार नाही ना गॅसचा त्रास होईल. तसेच प्रत्येक घासाचा आनंद आपल्याला आनंदाने घेता येईल. 

ऋजुता दिवेकर म्हणतात समजा आपल्यासमोर गरमागरम चविष्ट साबुदाणा वड्यांची प्लेट असेल तर सुरुवातीला फक्त एकच वडा घ्या. तो खाल्ल्यानंतर दुसरा वडा घेण्यापूर्वी स्वत:ला प्रश्न विचारा की, दुसरा वडा खाल्ल्यानंतर माझी तिसरा वडा खाण्याची इच्छा आहे का? जर आपले मन नाही म्हणत असेल तर एकाच वड्यावर थांबणं उत्तम, या पद्धतीने आपल्याला आपली भूक किती आहे हे समजेल. 

या पद्धतीने आपण पदार्थ खाल्ल्यास आपल्याला जेवणाचा आनंदीही मिळेल आणि पोटात जडपणा देखील येणार नाही. अनेकदा भरपूर जेवल्यानंतर ओव्हरईटिंगचा त्रास जाणवतो आणि आळस देखील येतो. या फॉर्म्युल्याला जॉर्डन फॉर्म्युला असंही म्हटलं जातं. कोणताही कडक डाएट नाही तर हा संतुलित विचार आहे. यामध्ये जेवणाचा आस्वाद घेतला जातो. पोट पूर्ण भरण्याच्या अगदी थोड्या आधी थांबल्यामुळे तुम्ही अधिक उत्साही आणि समाधानी राहता येत.


Web Title : पेट भरकर खाएं, वजन घटाएं: करीना कपूर की डायटीशियन का सीक्रेट फॉर्मूला

Web Summary : करीना कपूर की डायटीशियन, ऋजुता दिवेकर, सख्त डाइट के बिना भोजन का आनंद लेने की सलाह देती हैं। उनके 'जॉर्डन फॉर्मूला' में सोच-समझकर खाना शामिल है। दूसरी बार लेने से पहले, पूछें कि क्या आप वास्तव में और चाहते हैं। इससे अधिक खाने से बचने, संतुष्टि को बढ़ावा देने और पूरी तरह से भरने से थोड़ा पहले रुककर वजन प्रबंधन में मदद मिलती है।

Web Title : Eat fully, lose weight: Kareena Kapoor's dietitian's secret formula.

Web Summary : Kareena Kapoor's dietitian, Rujuta Diwekar, advises enjoying food without strict diets. Her 'Jordan Formula' involves mindful eating. Before a second helping, ask if you truly desire more. This helps avoid overeating, promoting satisfaction and weight management by stopping slightly before feeling completely full.