Join us

वजन आयुष्यभर राहील कंट्रोलमध्ये! फक्त २ गोष्टी नियमित करा- वजन वाढण्याची चिंता विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2025 09:20 IST

Weight Loss Tips: वजन वाढू द्यायचं नसेल आणि नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर हे काही सोपे उपाय करून पाहा..(just 2 tricks to control weight for lifetime)

ठळक मुद्देहे दोन उपाय जर तुम्ही केले तर वजन नियंत्रित ठेवण्यास नक्कीच मदत होईल असं डॉक्टर सांगतात. 

वाढत्या वजनाची चिंता हल्ली अनेकजणींना भेडसावते आहे. वजन कमी केलं तरी पुन्हा तेवढ्याच स्पीडमध्ये ते वाढतं आणि मग पुन्हा जशासतसेच होते, यामुळे कित्येक जण वैतागलेले असतात. यामध्ये महिलांचं प्रमाण तर जरा जास्तच आहे. कारण बहुसंख्य महिलांची एक प्रमुख अडचण अशी असते की त्यांना व्यायाम करायला वेळच मिळत नाही. तुमची ही अडचण सोडविण्यासाठी पुढे सांगितलेले काही खास उपाय पाहा. वजन कायमस्वरुपी नियंत्रित ठेवायचं असेल तर पुढे सांगितलेल्या दोन गोष्टी अगदी नियमितपणे करा आणि वाढत्या वजनाची चिंताच विसरा असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(just 2 tricks to control weight for lifetime)

 

वाढतं वजन कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

वाढतं वजन कमी कसं करायचं आणि कायमसाठी ते तसंच राहावं यासाठी काय उपाय करायचे याविषयीची माहिती डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दोन सोपे उपाय सांगितले आहेत.

१. आठवड्यातून एकदा कार्डिओ व्यायाम

बहुसंख्य महिलांची व्यायामाला वेळ मिळत नसल्याची अडचण डॉक्टरांनी सोडवली आहे. तुम्हाला जर रोज व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून एकदा ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्यादिवशी एक ते दिड तासांसाठी कार्डिओ व्यायाम करा. यामध्ये तुम्ही वॉकिंग, सायकलिंग, ट्रेकिंग, स्विमिंग असे व्यायाम करू शकता. किंवा मग जीममध्ये जाऊन कार्डिओ एक्सरसाईज करू शकता. यामुळे खूप कमी वेळात शरीरातल्या बऱ्याच कॅलरी कमी होतात.

 

२. उपवास करा

महिला आणि उपवास हे समीकरण आपल्याकडे आहेच. बहुसंख्य महिला कोणता ना कोणता उपवास करतातच. त्यामुळे उपवास करणं अनेकजणींना जड जात नाही. डॉक्टरांनीही तोच सल्ला दिला आहे पण उपवास मात्र थोडा वेगळ्या पद्धतीने करायला सांगितला आहे. उपवास म्हटलं की भगर, साबुदाणा, रताळी, बटाट्याचे पापड, चिप्स असे कित्येक चमचमीत पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. पण यापैकी कोणताही पदार्थ खायचा नाही. आठवड्यातून एक दिवस असा उपवास करायचा की त्या दिवशी फक्त सूप, सलाड, ताक, स्मूदी, फळं असंच काहीतरी खायचं. हे दोन उपाय जर तुम्ही केले तर वजन नियंत्रित ठेवण्यास नक्कीच मदत होईल असं डॉक्टर सांगतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४