आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात जे फक्त चवीपुरता नाही तर आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात.(Jeera water benefits for weight loss) सध्या वाढत्या वजनांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.(Cumin water for glowing skin) खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड, अपुरी झोप आणि अधिक प्रमाणात वाढलेला ताण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (Health benefits of drinking jeera water on empty stomach)
कामाच्या गडबडीमुळे अनेकदा आपण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतो. (How jeera water helps in slimming) सतत एकाच जागी बसणं आणि तिथेच बसून खाण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीराची हालचाल होत नाही.(Jeera water for digestion and metabolism) डाएट प्लान, व्यायाम करुन देखील बरेचदा आपले वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण शारीरिक कष्ट घेतो परंतु, काही नैसर्गिक गोष्टींचा देखील अवलंब करायला हवा. (Jeera water for better skin health)
पिवळसर दात, हिरड्यांमधून रक्त येते? वापरा 'ही' घरगुती पावडर, दाताच्या दुखण्यासाठी चांगला उपाय
आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा पदार्थ जिरे. जितका वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी होतो तितकाच आपले वजन कमी करण्यासाठी. जिऱ्याच्या पाण्यात लिंबू आणि मीठ घालून खाल्ल्याने त्याचे फायदे अनेक होतात. हे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. महिनाभर हे पाणी प्यायल्याने आपल्याला कसा फायदा होईल जाणून घेऊया.
1. पचन सुधारते
जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट असणारे गुणधर्म असतात. जे पचनसंस्था मजबूत करते. यामध्ये लिंबू आणि मीठ टाकल्यास ॲसिडिटी, गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे पाणी रोज प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
2. रोगप्रतिकारशक्ती मजबूत
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. जिरे पाण्यात मिसळून प्यायल्याने सर्दी आणि खोकला सारख्या अनेक आजारांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. त्यात चिमूटभर मीठ घातलं तर त्याचे फायदे दुप्पट होतात. शरीरासाठी नैसर्गिक संरक्षक कवच म्हणून काम करते.
कोमट पाण्यात 'हे' मसाले घालून प्या, पोट-मांड्यांवरची चरबी झपाट्याने कमी करणारं खास पाणी
3. वजन कमी करण्यास उपयुक्त
जर आपल्याला लवकर वजन कमी करायचे असेल तर जिरे पाणी लिंबू आणि मीठ घालून नक्कीच प्या. सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे पेय चयापचय गतिमान करण्याचे काम करते. यामुळे शरीरातील कॅलरीज लगेच कमी होतात. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते.
4. शरीर हायड्रेट राहाते
जिऱ्याचे पाणी, लिंबू आणि मीठ घालून प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता कमी होत नाही. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या होत असेल तेव्हा हे पाणी फायदेशीर ठरेल. व्यायाम केल्यानंतरही हे पाणी पिऊ शकता. यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात.