बैठी जीवनशैली, सतत एकाच जागी बसून राहणं, कामाचा ताण आणि जंक फूड यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.(weight loss tips) यामुळे आपल्या पोटावरची आणि मांड्यावरची चरबी वाढू लागते. वाढलेल्या पोटाच्या ढेरीमुळे फक्त आपल्या दिसण्यावरच नाही तर आरोग्यावरही तितकाच परिणाम होतो.(flat stomach remedy) वाढत्या वजनामुळे आपल्याला मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, ब्लड प्रेशर यांसारखे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. (weight loss home remedy)
प्रत्येकालाच वाटतं की, आपलं पोट अगदी स्लिम- ट्रिम असावं.(fat burning drink) बेली फॅट्स कमी करण्यासाठी आपण जीम, योगा, डाएटिंग करतो.(detox water benefits) वेगवेगळ्या सप्लिमेंट्स खातो पण अनेक उपाय करुन देखील पोटाचा घेर काही कमी होत नाही. पण रोज सकाळी ग्लासभर हे आयुर्वेदातील पाणी प्यायलं तर महिन्याभरात वजन आपलं कमी होईल. (Daily morning drink for reducing belly and thigh fat)
स्वयंपाकघरात आढळणारी मेथी ही फक्त पदार्थांची चव वाढवत नाही तर आपले आरोग्य देखील सुधारते. मेथी दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. मेथी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. आयुर्वेदात मेथी दाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे. वजन कमी करण्यासाठी, पचनासाठी, रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यासाठी, त्वचा आणि केसांसाठी मेथी फायदेशीर मानली जाते. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात, जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.
मेथी दाण्यांमध्ये असलेले फायबर भूक कमी करण्यास मदत करतात. रात्रभर पाण्यात मेथी दाणे भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे कॅलरीज देखील कमी होतोत.चयापचय सुधारून चरबी देखील वितळण्यास मदत होते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते रोज रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण असे महिनाभर केले तर शरीरात आपल्याला बदल पाहायला मिळतील. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथी दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. भिजवलेले मेथी दाणे चावून खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
मेथीमध्ये व्हिटॅमिन सी, डी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरसारखे आवश्यक पोषक घटक असतात. जे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन सारख्या समस्या कमी होतात. दररोज हे पाणी प्यायाल्याने अनेक समस्या टाळता येतील.