Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट...

कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट...

How to lose weight like Bhumi Pednekar : 35kg weight loss without strict diet vegetarian meals workouts : Bhumi Pednekar weight loss journey : Bhumi Pednekar 35kg weight loss : how Bhumi Pednekar lost weight : Bhumi Pednekar diet plan vegetarian : Bhumi Pednekar weight loss diet and workout : फक्त डाएटिंग किंवा जिममध्ये तासंतास घालवण्यापेक्षा स्मार्ट ट्रिक्स फॉलो करुन करा वेटलॉस सहज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 10:05 IST2025-08-30T10:00:00+5:302025-08-30T10:05:01+5:30

How to lose weight like Bhumi Pednekar : 35kg weight loss without strict diet vegetarian meals workouts : Bhumi Pednekar weight loss journey : Bhumi Pednekar 35kg weight loss : how Bhumi Pednekar lost weight : Bhumi Pednekar diet plan vegetarian : Bhumi Pednekar weight loss diet and workout : फक्त डाएटिंग किंवा जिममध्ये तासंतास घालवण्यापेक्षा स्मार्ट ट्रिक्स फॉलो करुन करा वेटलॉस सहज...

How to lose weight like Bhumi Pednekar Bhumi Pednekar weight loss journey Bhumi Pednekar 35kg weight loss how Bhumi Pednekar lost weight Bhumi Pednekar weight loss diet and workout | कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट...

कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट...

आजकाल प्रत्येकालाच फिट आणि निरोगी राहायचं असतं, पण वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा आपण स्ट्रिक्ट किंवा वेगवेगळ्या ट्रेंडिंग डाएटची मदत घेतो. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकत नाहीत. अशा परिस्थितीत, बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची वेटलॉस जर्नी (How to lose weight like Bhumi Pednekar) फारच प्रेरणादायी आणि फायदेशीर ठरते. ज्यांना उपाशी न राहता आणि स्ट्रिक्ट डाएट फॉलो न करता फिट आणि ॲक्टिव्ह राहायचं आहे त्यांच्या साठी भूमीचे हे खास फिटनेस सिक्रेट अत्यंत फायदेशीर ठरते. भूमीने तिच्या (Bhumi Pednekar weight loss journey) करिअरची सुरुवात 'दम लगाके हैशा' या चित्रपटातून केली होती आणि त्या भूमिकेसाठी तिने जवळपास ३० किलो वजन वाढवले होते. पण त्यानंतर तिने योग्य नियम पाळून ३५ किलोपर्यंत वजन कमी केले. विशेष म्हणजे, भूमीने वजन कमी (how Bhumi Pednekar lost weight) करण्यासाठी कधीही खाणं सोडलं नाही, उलट हेल्दी खाणं आणि नियमित व्यायाम ही तिची सवय बनवली(Bhumi Pednekar weight loss diet and workout).

फक्त डाएटिंग किंवा जिममध्ये तासंतास  घालवण्यापेक्षा तिने काही स्मार्ट आणि नैसर्गिक उपायांचा वापर केला, ज्यामुळे तिचं वजन कमी होऊन ती अधिक हेल्दी आणि सुंदर दिसू लागली. वजन कमी करण्यासाठी अनेकजण अमुकच पदार्थ खातात किंवा खाणचं सोडतात. परंतु असे न करता आपण स्वतःला काही हेल्दी सवयी लावून अगदी सहज पटकन वेटलॉस करु शकतो. भूमी पेडणेकरने वेटलॉस करताना कोणतंही स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं नव्हतं की तासंतास जिम देखील केली नाही, तरीही तिने तब्बल ३५ किलोंपर्यंत वजन कसे कमी केले याचे सिक्रेट पाहूयात. 

भूमी पेडणेकरने वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं? 

१. वर्कआऊट रुटीन :- भूमी पेडणेकर मानते की, फिटनेसचा सर्वात मोठा मंत्र ॲक्टिव्ह राहणे हाच आहे. तिने तिचे वर्कआऊट रुटीन नेहमीच अत्यंत साधेसोपे ठेवून त्यात गरजेनुसार बदल करत कायम सुरु ठेवले. तिने वर्कआऊटचे एकच रुटीन फॉलो न करता कधी पिलेट्स, कधी रनिंग, कधी स्ट्रेंथ ट्रेनिंग तर कधी वेट लिफ्टिंग असे ठेवले. तिचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही एकच व्यायाम पुन्हा पुन्हा करता, तेव्हा शरीर त्याला लवकर सरावते आणि त्याचे परिणाम कमी होतात. म्हणूनच, व्यायाम नेहमी बदलत राहायला हवा. भूमी तिच्या दिवसाची सुरुवात रनिंगने करायची आणि त्यानंतर १ तासाचा व्यायाम तिच्या दररोजच्या वर्कआऊट रुटीनचा भागच होता. 

'व्हिटामिन B - १२' ची कमतरता भरुन काढण्यासाठी रोज वाटीभर खा 'ही' डाळ, B - १२ वाढेल वेगाने - रहाल तंदुरुस्त... 

२. दररोज ७ ते ८ हजार पावले चालण्याची सवय :- भूमीचे म्हणणे आहे की, जिममध्ये घाम गाळण्याइतकेच दिवसभर ॲक्टिव्ह राहणेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच तिने स्वतःला दररोज ७,००० ते ८,००० पावले चालण्याचे टार्गेट दिले होते. पावले मोजल्याने फक्त कॅलरीजच जळत नाहीत, तर शरीरात ऊर्जाही टिकून राहते.

जेवताना पाणी प्यावे की जेवल्यानंतर ? पोषणतज्ज्ञ सांगतात, चांगल्या पचनासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती...  

३. हेल्दी व पौष्टिक नाश्त्याने करा दिवसाची सुरुवात :- भूमी नेहमी सांगते की, सकाळचा नाश्ता सर्वात महत्त्वाचा असतो. तिचा नाश्ता पोषक तत्त्वांनी भरपूर असायचा, ज्यात सुकामेवा, फळे आणि हेल्दी व पौष्टिक पदार्थ असायचे. यामुळे तिला दिवसभर ऊर्जा मिळायची आणि जिम किंवा वर्कआउटसाठी ताकदही  टिकून राहायची.

गरोदरपणानंतर पोटावर-दंडावर मोठ्ठे स्ट्रेच मार्क आले? ‘हे’ पारंपरिक तेल लावा-स्ट्रेच मार्क होतील कमी...

४. कायम शाकाहारी आहार घेते :- भूमीने एका मुलाखतीत सांगितले की, ती आता शाकाहारी झाली आहे आणि या बदलाने तिची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली आहे. तिचे म्हणणे आहे की, शाकाहारी आहारामुळे शरीर हलके आणि डिटॉक्स होते. तसेच, यामुळे पचन चांगले होते. ती किती खाते यापेक्षा काय खाते यावर नेहमीच लक्ष केंद्रित करते. 

५. स्ट्रिक्ट डाएट किंवा उपाशी राहणे नाही :- भूमीच्या वेटलॉस जर्नीमधील सिक्रेट हे आहे की तिने कधीही स्वतःला उपाशी ठेवले नाही. ती म्हणते की जर तुम्ही स्वतःला खाण्यापासून रोखले, तर ही पद्धत दीर्घकाळ काम करत नाही आणि शरीरावर उलट परिणाम करू शकते. तिने संतुलित आहार घेतला, ज्यात कार्ब्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स या सर्व गोष्टी होत्या, पण  त्याही अगदी नियंत्रित प्रमाणातच. 

६. स्वतःचा स्वीकार आणि संयम :- भूमी नेहमी सांगते की, वजन कमी करण्यापेक्षा स्वतःला स्वीकारणे आणि संयम ठेवणे जास्त महत्त्वाचे असते. फिटनेस हा कोणताही शॉर्टकट नसून ती एक लाईफस्टाईल आहे. तिने हळूहळू छोटे-छोटे बदल केले आणि सततच्या मेहनतीने तिचे शरीर पूर्णपणे बदलले.

Web Title: How to lose weight like Bhumi Pednekar Bhumi Pednekar weight loss journey Bhumi Pednekar 35kg weight loss how Bhumi Pednekar lost weight Bhumi Pednekar weight loss diet and workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.