प्रत्येक भारतीय घरात भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. मग तो वरण-भात असो किंवा बिर्याणी! पण मागच्या काही काळापासून डाएट आणि फिटनेसमध्ये भाताला व्हिलन ठरवण्यात आलं.(rice and weight loss) भात खाल्ला की पोट सुटतं किंवा वजन वाढतं या भीतीने अनेक जण भात खाणं टाळतात.(healthy rice tips) पण न्यूट्रिशनिस्ट सांगतात तांदळाची पेज काढून भात खायला हवा. (rice diet plan)
लहानपणी आई-आजी भात शिजवल्यानंतर त्याच्या वरचे पाणी काढून टाकायचे किंवा ते पाणी लहान मुलांना पेज म्हणून प्यायल्या द्यायचे. पण सध्या भात हा कुकरमध्ये शिजवला जातो, ज्यामुळे त्यातील पाणी आतच आटवले जाते. यामुळे तांदळातील सर्व घटक भातातच राहतात.(weight management tips) पण खरंच भाताचे पाणी काढल्यानंतर त्यातील कॅलरीज कमी होतात का? वजन कमी करणे म्हणजे केवळ कॅलरीज कमी करणे नव्हे, तर शरीराला योग्य पोषण देणे देखील असते. तांदळाचा पाणी आणि वजन वाढणे यामागचे नेमके गणित काय आहे, जाणून घेऊया न्यूट्रिशनिस्टकडून...
जाड दंडांमुळे साडी नेसली की फार बेढब दिसता? बाह्यांचे ५ डिझाईन्स पाहा, दंड दिसतील सुबक आणि स्लिम!
1. डॉ. शिखा म्हणतात, तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च असतात. जेव्हा आपण तांदूळ भरपूर पाण्यात शिजवून त्याचे वरचे पाणी काढून टाकतो. तेव्हा त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो. यामुळे भाताचा चिकटपणा कमी होतो. यातील कॅलरीजचे प्रमाण साधारणपणे १० ते १५ टक्क्यांनी कमी होते.
2. पाणी काढून शिजवलेला भात पचायला हलका असतो. मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी भाताचे पाणी काढून खाल्ले भात आरोग्यासाठी चांगला ठरतो. कारण यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.
3. तांदळाच्या पाण्यात फक्त स्टार्च नसतो, तर त्यात व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स आणि खनिजेही असतात. त्यातील पाणी फेकून दिल्याने ही पोषक तत्वे वाया जातात. त्यामुळे वजन कमी होत असले तरी शरीराला मिळणारे पोषण कमी होऊ शकते.
4. भातासोबत भरपूर प्रमाणात पालेभाज्या, सॅलड आणि डाळींचा समावेश करा. यामुळे फायबर वाढते आणि पोट लवकर भरते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस खाणे अधिक फायदेशीर ठरते.
