वजन वाढू लागले अनेकांना टेन्शन येते. वाढत्या वजनामुळे आपण जीम लावतो, डाएट करतो पण काही केलं तरी वजन काही कमी होत नाही.(Chapati for weight loss) शरीरात वाढलेली चरबी कमी कशी करायची यावर जास्त भर देतात. अनेकजण तर जेवण देखील बंद करतात.(Weight loss Indian diet) पण असं केल्याने आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळत नाही. वेटलॉसच्या या प्रवासात सगळ्यात जास्त गोंधळ उडतो तो म्हणजे चपाती खावी की नाही?(Healthy chapati recipe) बऱ्याच जणांना वाटतं की वजन कमी करायचं असेल तर चपाती, भात, कार्बोहायड्रेट्स सगळं बंद करावं लागतं.(Roti vs rice for weight loss) खरंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला सर्वप्रकारचे कार्ब्स, फायबर आणि प्रोटीन देखील महत्त्वाचे असतात. चपाती हा पदार्थ भारतीय घरांमध्ये रोज खाल्ला जातो. (High protein roti meal)
हिवाळ्यात आपल्याला भूक जास्त लागते, शरीराला ऊर्जा जास्त प्रमाणात हवी असते. अशावेळी चपाती पूर्णपणे बंद केली तर उलट थकवा, चिडचिड आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. डाएटमध्ये चपाती असणं हा सगळ्यात जास्त चांगला पर्याय आहे.
डॉक्टर म्हणतात चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि काही आवश्यक खनिजे असतात. त्यासाठी चपाती पूर्णपणे सोडू नका. पण त्याचे योग्य प्रमाण आणि वेळ समजून घेणे. चपातीमध्ये असणाऱ्या कॅलरीज या त्याच्या पीठावर अवलंबून असतात. गव्हाच्या पीठाची चपाती खात असाल तर एका चपातीत किमान ८० ते १२० कॅलरीज असतात. पातळ चपातीत ६० ते ७० कॅलरीज असतात. आपण तुपाची चपाती खात असू किंवा मल्टीग्रेन चपाती खात असू तर कॅलरीज बदलतात.
सावळ्या रंगाच्या मुलींसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, ५ पर्याय- ओठ दिसतील सुंदर, लूकही येईल खुलून
वजन कमी करण्यासाठी कार्ब्ससोबत प्रथिने देखील खूप महत्त्वाचे आहे. कार्ब्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. रक्तातील साखर संतुलित राहते. जर आपण चपाती खायची बंद केली तर आपल्याला अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो. गव्हाच्या पीठामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काहीजणांना अपचन आणि ब्लोटिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर आपण गव्हाच्या पीठामध्ये चण्याचे पीठ, सोयाचे पीठ आणि इतर पीठांचे मिश्रण करुन चपाती बनवू शकतो. ज्यामुळे शरीराला योग्य प्रोटीन्स आणि कार्ब्स मिळतील. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
Web Summary : Don't ditch chapati for weight loss. It provides carbs, fiber, and minerals. Balance calories by choosing thin or multigrain options. Mix flours for added protein and easier digestion to aid weight management.
Web Summary : वजन घटाने के लिए चपाती न छोड़ें। यह कार्ब्स, फाइबर और खनिज प्रदान करती है। पतली या मल्टीग्रेन विकल्प चुनकर कैलोरी संतुलित करें। वजन प्रबंधन में सहायता के लिए अतिरिक्त प्रोटीन और आसान पाचन के लिए आटे मिलाएं।