Join us  

तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2023 6:33 PM

Fitness Tips By Tahira Kashyap: अभिनेता आयुषमान खुराणाची पत्नी तसेच दिग्दर्शक, लेखिका तहिरा कश्यप हिने नुकतंच सोशल मिडियाद्वारे तिचं फिटनेस सिक्रेट शेअर केलं आहे...(How to built up immunity)

ठळक मुद्देहा गरमागरम चहा रोज सकाळी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असं तहिरा कश्यप सांगते. 

तहिरा कश्यप हे एक नेहमीच चर्चेत असणारं नाव. ती अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी तर आहेच, पण त्याबरोबरच एक यशस्वी निर्माता, लेखिका म्हणूनही ती ओळखली जाते. ती चर्चेत असण्याचं आणखी एक कारण काही वर्षांपुर्वी तिला कॅन्सर झाला होता. पण आता मात्र संपूर्ण ट्रिटमेंट पुर्ण करून ती कॅन्सरमुक्त जीवन जगत आहे (fitness tips by Tahira Kashyap). तिने या आजाराला हिमतीने दिलेला लढा ही सगळ्यांसाठीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे (How to built up immunity). आता या आजारातून बाहेर पडल्यानंतर अधिकाधिक आरोग्यदायी जीवन जगण्याचा तिचा प्रयत्न असावा.. म्हणूनच तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ती नेमकं काय करते, याविषयी माहिती देणारी एक पोस्ट तिने साेशल मिडियावर शेअर केली आहे. (special immunity booster tea recipe by Tahira Kashyap)

 

तहिराने इन्स्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने दोन प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत. यापैकी पहिली गोष्ट अशी आहे ज्या गोष्टीने ती दिवसाचा शेवट करते, तर दुसरी गोष्ट अशी आहे ज्याने ती दिवसाची सुरुवात करते.

पाण्यानं धुतली म्हणजे स्ट्रॉबेरी स्वच्छ झाली? पाहा स्ट्रॉबेरी धुण्याची ‘ही’ योग्य पद्धत, अळ्याही निघतील बाहेर

रोज रात्री झोपण्यापुर्वी ती बदाम, मनुका, अक्रोड असा सुकामेवा पाण्यात भिजत टाकते आणि दुसऱ्यादिवशी सकाळी तो खाते. हा तिने सांगितलेला उपाय तर आरोग्यदायी आहेच. पण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तिने एक खास चहा रेसिपीही शेअर केली आहे. 

 

तहिरा कश्यपने शेअर केलेली इम्युनिटी बुस्टर चहा रेसिपी

तहिरा कश्यप करतेय तसा रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा चहा करायचा असेल तर त्यासाठी आलं, गवतीचहा, लिंबू, गूळ आणि ओली हळद एवढं साहित्य लागणार आहे.

कपड्यावर ऑईल पेंटचे डाग पडले? ४ सोपे उपाय करा, डाग कुठे पडले होते ते लक्षातही येणार नाही

सगळ्यात आधी एक कपभर पाणी गॅसवर उकळायला ठेवा आणि वरील सर्व गोष्टी पाण्यात बारीक चिरून टाका. पाण्याला चांगली उकळी आली की गॅस बंद करा.. हा गरमागरम चहा रोज सकाळी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असं तहिरा कश्यप सांगते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सताहिरा कश्यपकर्करोग