सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीत वजन वाढणं, पोट सुटणं आणि शरीरावर अनावश्यक चरबी जमा होणं ही अत्यंत सामान्य समस्या आहे.(Zone Diet for weight loss) ऑफिसमध्ये तासंतास काम करणं, जंकफूड, झोपेचा अभाव आणि अनियमित आहारामुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो.(Belly fat diet plan) यामुळे आपल्या पोटाच्या भोवती चरबी साचते. शरीर जड वाटू लागतं आणि आपली एनर्जीही कमी होते.(Weight loss diet India) अशावेळी आपण विविध डाएट फॉलो करतो. व्यायाम करतो पण तरी देखील वजन काही लवकर कमी होत नाही. (Reduce belly bloating)
Zone Diet चा प्रकार सध्या जास्त प्रमाणात चर्चेत आहे. हे फक्त आपलं वजन कमी करत नाही तर शरीरात इन्सुलिन आणि हार्मोन्सचे संतुलन देखील राखण्यास मदत करते.(Healthy diet plan) याचे मुख्य तत्व म्हणजे आहारातील कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट याचं संतुलन ठेवणं. जर आपल्यालाही आठवड्याभरात वजन कमी करायचे असेल तर झोन डाएट नक्की फॉलो करा. (Hormone balance diet)
झोन डाएटमध्ये जेवणात ४०% कार्बोहायड्रेट्स, ३०% प्रथिने आणि ३०% निरोगी चरबी असणारे पदार्थ असायला हवे. हे आपल्या इन्सुलिन हार्मोन्सचे संतुलन करते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. या आहाराचा मुख्य उद्देश हा असतो की साखरेतील पातळी नियंत्रणात राहावी. ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहिल आणि सतत खाण्याची इच्छा कमी होईल.
आठवड्याभरात वजन कमी करायचे असेल तर आपण डाएट प्लान करायला हवा. यात नाश्त्यासाठी अंडी किंवा दूध, ओट्स, बदाम खाऊ शकता. यामुळे शरीराला प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, आणि निरोगी फॅट्स मिळते. दुपारच्या जेवणात ब्राउन राइस, टोफू, सलाद खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात आपण मसूर, उकडलेल्या भाज्या आणि चमचाभर तूप खाऊ शकता. शरीराला यातून योग्य पोषण मिळेल.
झोन डाएटमुळे हार्मोन्स आणि चयापचयवर थेट परिणाम होतो. जास्त प्रमाणात कार्ब्स खाल्ले की इन्सुलिन पातळी वाढते, ज्यामुळे चरबी जमा होते. ६ ते १२ महिने झोन डाएटचे फॉलो केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील सुधारते. तसेच बाहेरचे जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळा. पुरेशी झोप घ्या. सकस आहारासोबत व्यायाम देखील करा. ज्यामुळे आपले आठवड्याभरात काही प्रमाणात वजन कमी होईल.
