साऊथ अभिनेत्री कीर्ती सुरेश ही केवळ तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही तर तिच्या फिगरसाठी देखील ओळखली जाते. (Keerthy Suresh weight loss) तिचे चाहते देखील बरेच आहेत. तिच्या आकर्षक आणि फिट बॉडीमुळे ती प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. पण मध्यंतरी तिचे वजन अचानक वाढले.(Keerthy Suresh diet plan) कीर्ती सुरेशची फिटनेस जर्नी ही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतेय. (South actress weight loss secrets)
शूटिंग, प्रवास आणि ताणतणावाच्या व्यस्त दिनचर्येतही तिनं स्वतःसाठी वेळ काढला आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं. (Simple Indian diet for weight loss)वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तिने ना डाएट केलं ना महागडे प्रोटिन्स खाल्ले. व्यायाम आणि संतुलित आहारासोबत तिने ९ किलो वजन कमी केलं. (Keerthy Suresh transformation)
वयाच्या ३३ व्या वर्षांतही ती अगदी २३ वर्षांची दिसते. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, फक्त कार्डिओच्या मदतीने ८ ते ९ किलो वजन कमी केले. ती म्हणते की, मी नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यावर जास्त भर दिला. निरोगी राहाण्यासाठी कार्डिओ करत होती. ज्यामुळे माझे स्नायू लवकर कमी होऊ लागले. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर तिने फक्त काम, खाणं आणि झोप यावर लक्ष केंद्रित केलं ज्यामुळे वजन वाढायला सुरुवात झाली. कार्डिओ केल्यानंतर हळूहळू वजन कमी होऊ लागले.
कीर्तीने कोणाताही सिक्रेट डाएट प्लान फॉलो केला नाही. आहारात जास्त प्रथिने, कमी कार्बोहायड्रेटस खाऊन आणि कार्डिओचा सराव करुन वजन कमी केलं. तिने फॅट वाढवणारे पदार्थ खाणे बंद केले. नाश्त्यात पौष्टिक पदार्थ, दुपारचं हलकं जेवण, रात्रीचं डिनर कमी आणि मधे भरपूर पाणी, फळं व भाज्यांचा समावेश केला. बाहेरचं तेलकट, पॅक्ड आणि साखरयुक्त पदार्थ पूर्णपणे टाळले.
तसेच ती रोज नियमितपणे योगा, स्ट्रेचिंग आणि वॉकला जाण्यास प्राधान्य देते. सायकलिंग, कार्डिओ, जॉगिंग करते. इतकेच नाहीतर बोटिंग आणि पोहायला सुद्धा जाते. ज्यामुळे तिने काही महिन्यातच तिचे ९ किलो वजन कमी केलं.