गणपती उत्सवाला घरोघरी उत्साहात प्रारंभ झालेला आहे. आज गणपतीची स्थापना होते. त्यामुळे घरोघरी नैवेद्यासाठी एकतर तळणीचे किंवा उकडीचे मोदक केले जातात. यानंतर मग पुढे १० दिवस अगदी पेढ्यांना मोदकाचा आकार देऊन त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. पण पहिल्या दिवशी मात्र घरी केलेल्या मोदकांचाच मान असतो. हल्ली गोड खाणं सगळ्यांचंच कमी झालं आहे. पण तरीही ज्यांना शुगर, वजन वाढण्याची भीती वाटते त्यांना मोदक खावं की नाही याचं खूप टेन्शन येतं. असाच विचार तुम्हीही करत असाल तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला ऐकाच..
वजन, शुगर वाढेल म्हणून मोदक खावा की नाही असं वाटतंय?
ऋजुता दिवेकर नेहमीच पारंपरिक पदार्थांचं समर्थन करतात. पारंपरिकता जपत तब्येत कशी सांभाळावी यावर त्यांचा भर असतो. त्या सांगतात की आजच्या दिवस जर मोदक तुम्ही प्रसादासारखा खाल्ला तर त्यामुळे तुमच्या तब्येतीवर लगेचच कोणताही विपरित परिणाम होणार नाही.
गणेशोत्सव: तळणीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं? घ्या रेसिपी- मोदक होतील खमंग, चवदार
त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या दिवसात एखादा मोदक खायला काहीच हरकत नाही. याची मात्र काळजी घ्या की तो मोदक पारंपरिक पद्धतीने केलेला असावा. दुकानात विकत मिळतात ते पेढ्याचे मोदक खाणं मात्र आवर्जून टाळायलाच हवं.
माेदक खाण्याचे फायदे
पारंपरिक पद्धतीने केलेले उकडीचे मोदक असाे किंवा मग तळणीचे मोदक असो, ते आरोग्यदायीच आहेत. पण तो प्रसाद असतो आणि प्रसादासारखाच खायला हवा याकडे मात्र लक्ष द्या.
चहाचं पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा! न्हाऊन होताच केसांच्या समस्या कमी झालेल्या दिसतील..
आवडतो म्हणून एकामागे एक सणकून मोदक खाऊ नका. मोदकामध्ये असणारे खोबरे, गूळ, तांदळाचे पीठ किंवा तळणीच्या मोदकातले गव्हाचे पीठ, रवा हे आरोग्यासाठी घातक नाहीच. त्यामुळे. सणावाराच्या दिवसांत मनात कोणताही गिल्ट न ठेवता आनंदी मनाने मोदकांचा आस्वाद घ्या.