Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > व्यायाम- डाएट करुनही वजन होत नाही कमी? 'या' ५ क्षुल्लक चुकांचा परिणाम, पाहा सोपा उपाय

व्यायाम- डाएट करुनही वजन होत नाही कमी? 'या' ५ क्षुल्लक चुकांचा परिणाम, पाहा सोपा उपाय

weight loss mistakes increasing fat: common reasons for weight loss failure: डॉक्टर म्हणतात योग्य पद्धतीचा अवलंब करुन वजन कमी करता येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 14:09 IST2025-06-09T14:09:11+5:302025-06-09T14:09:54+5:30

weight loss mistakes increasing fat: common reasons for weight loss failure: डॉक्टर म्हणतात योग्य पद्धतीचा अवलंब करुन वजन कमी करता येते.

Exercise- Dieting but not losing weight 5 mistakes increasing weight do some home remedies for weight loss | व्यायाम- डाएट करुनही वजन होत नाही कमी? 'या' ५ क्षुल्लक चुकांचा परिणाम, पाहा सोपा उपाय

व्यायाम- डाएट करुनही वजन होत नाही कमी? 'या' ५ क्षुल्लक चुकांचा परिणाम, पाहा सोपा उपाय

सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा सल्ला आपल्याला नेहमीच दिला जातो.(Weight loss tips) त्यात शरीराला ऊर्जात्मक ठेवण्यासाठी आपण अनेक प्रॉडक्टिव्ही कामे करायला हवी असे देखील म्हटले जाते.(common reasons for weight loss) आपल्यापैकी असे अनेकजण आहेत, जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट देखील करतात.(why increasing fat) परंतु काही केल्या वजन काही कमी होत नाही. 
उलट वजन कमी होण्याऐवजी ते भराभर वाढते. वाढत्या वजनामुळे आपल्याला कधीकधी आपलीच लाज वाटू लागते. अनेक स्टायलिश कपडे देखील घालता येत नाही.(home remedies to lose weight fast) लठ्ठपणा वाढू लागला की आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. कोलेस्टेरॉल, हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि फॅटी लिव्हर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(Indian weight loss tips at home) अशातच आपण शक्य तितक्या लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो. व्यायाम केल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना वारंवार वजन कमी झाले की, नाही हे तपासण्याची सवय असते.(why am I not losing weight even after gym) परंतु, डॉक्टर म्हणतात योग्य पद्धतीचा अवलंब करुन वजन कमी करता येते. (slow metabolism weight loss tips)

तमन्ना भाटियाचं ब्यूटी सिक्रेट! त्वचेसाठी करते आईने सांगितलेला घरगुती उपाय, तिच्या देखण्या तारुण्याचे रहस्य

डॉक्टर म्हणतात की, वजन कमी करणे म्हणजे केवळ आकडा नव्हे तर आपल्या शरीरातील चरबी कमी होणे आणि स्नायूची योग्य प्रकारे वाढ होणे. पचनक्रिया, आपण काय खातो यावर सगळं काही अवलंबून असते. आकड्यांकडे लक्ष देण्याऐवजी आपण शरीराच्या रचनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी काय करायला हवे पाहूया. 

1. चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायूची वाढ होण्यासाठी प्रथिनांचे सेवन वाढवा. जेवणात अंडी, चीज, मसूर, मासे, चिकन आणि टोफू खा. 

2. स्ट्रेंथ ट्रेनिंग वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. व्यायाम करताना फक्त कार्डिओ करु नका. आठवड्यातून २ ते ३ वेळा वेट लिफ्टिंग किंवा रेझिस्टन्स वर्कआउट करा. यामुळे चयापचय वाढेल आणि चरबी कमी होण्यास मदत होईल. 


3. आपल्या खाण्यापिण्यात कार्बोहायड्रेट चांगल्याप्रकारे निवडा. कार्बोहायड्रेट चांगले किंवा वाईट असू शकतात. अल्ट्रा-प्रोसेस्ड जंक फूड खाणे टाळा. भात, चपाती फळे योग्य प्रमाणात खा. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. 

4. चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. डॉक्टर म्हणतात आपण झोपेला जास्त प्राधान्य द्यायला हवे. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराची चरबी कमी होण्याची गती कमी होते. त्यासाठी दररोज ७ ते ८ तास झोप घ्यायला हवी. 

5. जीममध्ये जाऊन कॅलरीज बर्न करण्याऐवजी आपण अधिक चालायला हवे, वारंवार उभे राहा- पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करा. वजन कमी करण्यासाठी या छोट्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. 
 

Web Title: Exercise- Dieting but not losing weight 5 mistakes increasing weight do some home remedies for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.