कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण.. - Marathi News | Eating onion and brinjal in monsoon is not good for health | Latest sakhi News at Lokmat.com
>आहार -विहार > कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण..

कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण..

आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस म्हणजे आषाढ महिन्यातल्या नवमीला कांदे नवमी साजरी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. ही काही नुसतीच परंपरा नाही बरं का... याच्या मागे मोठे शास्त्र दडले आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 01:18 PM2021-07-18T13:18:31+5:302021-07-18T13:24:55+5:30

आषाढी एकादशीच्या आधी दोन दिवस म्हणजे आषाढ महिन्यातल्या नवमीला कांदे नवमी साजरी करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. ही काही नुसतीच परंपरा नाही बरं का... याच्या मागे मोठे शास्त्र दडले आहे...

Eating onion and brinjal in monsoon is not good for health | कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण..

कच्चा कांदा आणि वांगी पावसाळ्यात खाल तर पस्तावाल! जीभेचे चोचले आवरते घ्या कारण..

Next
Highlightsकच्चा कांदा खाण्याचा मोह पावासाळ्यात टाळायलाच हवा..ज्यांना त्वचाविकार आहे तसेच ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, अशा लोकांनी पावसाळ्यात वांगी खाणे पुर्णपणे टाळावे. 

पावसाळा आणि कांदा भाजी हे एक अतिशय चविष्ट समीकरण आहे. याशिवाय मस्त मऊसुत भाकरी, ठेचा, चमचमीत लाेणचं आणि तोंडी लावायला कच्चा कांदा...असा जेवणाचा थाटही अनेकांना प्रिय असतो. कुणाला कोशिंबीरीतून कच्चा कांदा हवाच असतो तर कुणाला कांद्याशिवाय भाजी ही कल्पनाच करवत नाही. असे तुमच्या जीभेचे अगणित चोचले आता मात्र आवरते घ्या.  कारण कांदा नवमी झाल्यानंतर  महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये  कांदे- वांगे आणि लसूण खाणे बंद केले जाते. पावसाळ्यात नेमकी या तीन पदार्थांच्या सेवनावरच गदा का येत असावी बरं...?

 

बहुगुणी कांदा...
वेगवेगळ्या आजारांसाठी कांदा हा अतिशय गुणकारी ठरतो. याशिवाय जेवणाची चव वाढविणारा मुख्य घटक म्हणूनही कांद्याकडे पाहिले जाते. कांद्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, गंधक, जीवनसत्व अ, ब आणि क, फायबर मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे आरोग्याला खूप फायदे होतात. पण असे असेल तरीही कच्चा कांदा खाण्याचा मोह पावासाळ्यात टाळायलाच हवा..

 

का खाऊ नये पावसाळ्यात कांदा ?
कांदा हा वातूळ पदार्थ आहे. पावसाळ्यात अनेकांच्या शरीरातील वातप्रकृती वाढलेली असते. वातप्रकृती वाढलेली असताना कांदा खाणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. कारण पावसाळ्यात आपला जठराग्नी मंदावलेला असतो. त्यामुळे वातूळ आणि पचायला जड असणारे पदार्थ खाणे पावसाळ्यात टाळावे. याशिवाय कांद्यासारखा वातूळ पदार्थ पावसाळ्यात कच्चा खाल्ल्यास पायात, पोटात गोळे येणे, पोट दुखणे, पचन संस्थेचे कार्य सुरळीत न होणे, चयापचय क्रियेत अडथळे होणे, असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या चार दिवसांमध्ये कच्चा कांदा खाणे शक्यतो टाळावे. कांदा परतून किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये टाकून शिजवून खाल्ल्यास आरोग्याला अपाय होत नाही.

 

पावसाळ्यात वांगे का नको ?
वांगी ही अशी एक फळभाजी आहे जी पटकन खराब होते. वांगे जास्त काळ राहिले तरी त्यात अळ्या होतात. पावसाळ्यात हवामान दमट असते. पुर्वीच्या काळी तर पावसाळ्यात अनेक दिवस सुर्य दर्शनही व्हायचे नाही. त्यामुळे वांगी खराब होऊन त्यात अळ्या पडण्याची शक्यता खूप जास्त असते. असे वांगे खाणे आरोग्यासाठी घातकच. ज्यांना त्वचाविकार आहे तसेच ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे, अशा लोकांनी पावसाळ्यात वांगी खाणे पुर्णपणे टाळावे. 

 

Web Title: Eating onion and brinjal in monsoon is not good for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

जेवता जेवता सारखं पाणी पिता, दर घासाला पाणी? म्हणून तब्येतीच्या तक्रारी छळतात का? - Marathi News | Is it good to drink plenty of water while eating? Is it harmful for digestion? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवता जेवता सारखं पाणी पिता, दर घासाला पाणी? म्हणून तब्येतीच्या तक्रारी छळतात का?

तुम्हालाही जर जेवताना सतत पाणी प्यायची सवय असेल, तर ही सवय सोडून द्या. कारण यामुळेच पचनासंबंधी अनेक तक्रारी निर्माण होतात. ...

Food Tips : पनीरच्या भाजीला मिळेल मसालेदार ट्विस्ट; ही घ्या चमचमीत पनीर घोटालाची हॉटेल स्टाईल रेसेपी - Marathi News | Food Tips : Paneer ghotala recipe give a masaledaar twist to a regular paneer curry with this recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच्या पनीरच्या भाजीला मिळेल मसालेदार ट्विस्ट; ही घ्या चमचमीत पनीर घोटालाची हॉटेल स्टाईल रेसेपी

Food Tips : हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पनीरच्या असंख्य डीशेसची नावं ऐकायला, वाचायला मिळतात. घरात बनवताना मात्र त्याच कॉमन चवीची भाजी बनवली जाते.  ...

वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका.. - Marathi News | Want to lose weight? Then never make these mistakes at night. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं आहे ना? मग रात्री 'या' चुका कधीच करू नका..

weight loss किंवा dieting करत असाल तर रात्रीच्या वेळी काही गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे... ...

Pitru Paksha 2021 : .....म्हणून पितृपक्षाच्या पारंपरिक स्वयंपाकात वापरत नाहीत 'या' ४ गोष्टी; चुकूनही करू नका सेवन - Marathi News | Pitru paksha 2021: Do not eat these 5 food in pitra paksha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :.....म्हणून पितृपक्षाच्या पारंपरिक स्वयंपाकात वापरत नाहीत 'या' ४ गोष्टी

Pitru Paksha 2021 : पितृ पक्षात काही पदार्थांचे सेवन टाळणं फायद्याचं ठरतं हे तुम्ही ऐकून असालच. या कालावधीत कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे जाणून घ्या. ...

तुमची जीभ बघा, ती सांगते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता! लक्षणं कोणती, उपाय काय? - Marathi News | Look at your tongue, it says vitamin D deficiency! What are the symptoms, what is the remedy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमची जीभ बघा, ती सांगते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता! लक्षणं कोणती, उपाय काय?

शरीराचं कार्य उत्तम चालावं, यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा एक घटक म्हणजे व्हिटॅमिन डी. आरोग्याच्या अशा काही तक्रारी जाणवल्या तर व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, हे लक्षात घ्या.  ...

Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad - Marathi News | Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Bhatti Vada pav In Mumbai | Wood Fired Vada Pav | Mumbai Street Food | Being Bhukkad

तुम्ही आज पर्यंत स्टोव्ह वर बनवलेला वडापाव खाल्ला असेल पण तुम्ही कधी भट्टी मध्ये बनवलेला वडापाव खाल्ला आहे का ? आज आम्ही घेऊन आलो आहे ७० वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रातील मुंबई येथील सर्वोत्कृष्ट वडापाव निर्माते शिंदे बंधू यांनी पिढ्यानं पिढ ...