Join us  

तुमच्या घरात जिरे - गूळ आहे? आणि वजनही कमी करायचं आहे? हा घ्या सोपा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 7:06 PM

वजन कमी करण्यासाठी काय- काय करावं, हा प्रश्न पडलाय, मग सगळे विचार सोडा आणि फक्त या २ गोष्टी नियमित खा...वजन कमी होऊन आरोग्य राहील उत्तम...

ठळक मुद्देया उपायामुळे मासिक पाळीचा बहुतांश त्रास कमी होतो.

बैठ्या कामाचे वाढलेले तास आणि व्यायामाचा अभाव या दोन कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला बऱ्याच अंशी आपली चुकीची आहारपद्धतीही जबाबदार आहे. कारण पिझ्झा, चायनिज किंवा काहीच नसलं तर आपला वडापाव... अशा चटकमटक पदार्थांची आपल्याला लागलेली सवय. असे पदार्थ आपल्या जिभेचे चोचले पुरवितात, पण तब्येतीचं मात्र पार नुकसान करून टाकतात. असे पदार्थ खाल्ल्यानंतर जेवढं वर्कआऊट करायला पाहिजे, तेवढं आपल्याकडून केलं जात नाही. त्यामुळे भराभर वजन वाढतं. वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, तर नियमित वर्कआऊट करा आणि त्यासोबतच गुळ आणि जिरे हे दोन पदार्थ एकत्र करून नियमितपणे खा.

 

हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाक घरात उपलब्ध असतात. आपण ते बऱ्याचदा खातो पण. आता हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे खाण्यापेक्षा एकत्र करा आणि मग खा. गुळ आणि जीरे एकत्र खाण्याचे खूप फायदे आहेत. आरोग्यासाठी हे एक best food combination असून यामुळे वजन तर झटपट कमी होतेच, पण अनेक आजार होण्यापासूनही आपला बचाव होतो. आपल्याकडे बऱ्याचदा आंबट वरण करताना जीऱ्याची फाेडणी घालण्यात येते आणि वरणात गुळ घातला जातो. असं वरण खाण्यचेही खूप फायदे आहेत.

 

जिरे आणि गुळ एकत्र करून का खावे?१. वजन कमी करण्यासाठी उत्तमवजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी गुळ आणि जिऱ्यापासून बनविलेला काढा घ्यावा. हा काढा तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये अर्धा टेबलस्पून जीरे टाका. हे पाणी दोन ते तीन मिनिटे उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या. आता या पाण्यात अर्धा टेबलस्पून गुळ टाका. पाणी चांगलं हलवून घ्या आणि पिऊन टाका. हा काढा दररोज रिकाम्यापोटी घेतल्यास वेटलॉससाठी उपयुक्त ठरतो. 

 

२. रक्ताची कमतरता असल्यास....आपल्याला माहितीच आहे की गुळामध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असते. त्यामुळे अशक्त लोकांना किंवा ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, अशा लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळासोबत जर जीरेही खाल्ले तर शरीरातले रक्ताभिसरण अधिक उत्तम पद्धतीने होते. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून रक्ताभिसरण उत्तम होण्यासाठी जीरे आणि गुळ एकत्र करून खावे. 

 

३. बीपी राहते नॉर्मल...जीरे आणि गुळ हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्याशिवाय गुळ आणि जीरे या दोन्ही पदार्थांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचे चांगले प्रमाण असते. हे दोन्ही घटक रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांना गुळ आणि जीरे एकत्र करून खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

४. हाडे होतात मजबूतजीरे आणि गुळ या दोन्ही पदार्थांमध्ये कॅल्शियमचीही चांगली मात्रा असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी दररोज सकाळी गूळ आणि जीरे एकत्र करून खावे. लहान मुलांनाही हा पदार्थ जर बालपणापासूनच नियमितपणे द्यावा. बहुतांश वृद्ध व्यक्तींची हाडे ठिसूळ झालेली असतात. त्यामुळे वयस्कर व्यक्तींनीही गुळ- जीरे एकत्र करून खावेत.

 

५. मासिक पाळीचा त्रास होतो कमीमासिक पाळीच्या काळात खूप ब्लिडिंग होणे किंवा मग पायात गोळे येणे, खूप जास्त पोट दुखणे असे त्रास बहुतांश जणींना जाणवतात. या सगळ्या त्रासांवरचा उत्तम आणि नैसर्गिक उपाय म्हणजे गुळ आणि जीरे यांचे पाणी एकत्र करून घेणे. या उपायामुळे मासिक पाळीचा बहुतांश त्रास कमी होतो. जीरे आणि गूळ या दोन्ही पदार्थांत लोह आणि ॲण्टीऑक्सिडंट्स यांचं उत्तम प्रमाण असतं. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी या दोन पदार्थांचा खूप जास्त उपयोग होतो. 

  

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स