Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढेल म्हणून कार्ब बंद केले? तज्ज्ञ सांगतात, कार्बमुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन..

वजन वाढेल म्हणून कार्ब बंद केले? तज्ज्ञ सांगतात, कार्बमुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन..

Simple Weight Loss Tips: वजन वाढेल म्हणून तुम्हीही भात, पोळी असे कार्बोहायड्रेट्सयुक्त् पदार्थ खाणं टाळत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचाच...(Do carbs lead to weight gain?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2025 16:24 IST2025-02-28T09:24:01+5:302025-02-28T16:24:04+5:30

Simple Weight Loss Tips: वजन वाढेल म्हणून तुम्हीही भात, पोळी असे कार्बोहायड्रेट्सयुक्त् पदार्थ खाणं टाळत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचाच...(Do carbs lead to weight gain?)

Do carbs lead to weight gain? simple weight loss tips | वजन वाढेल म्हणून कार्ब बंद केले? तज्ज्ञ सांगतात, कार्बमुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन..

वजन वाढेल म्हणून कार्ब बंद केले? तज्ज्ञ सांगतात, कार्बमुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन..

Highlightsकार्ब्स असणारे कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे?

आपल्या शरीराल प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अशा सगळ्या घटकांची जशी गरज असते तशीच गरज कार्बोहायड्रेट्सचीही असते. पण हल्ली नो कार्ब्स डाएटचा खूपच ट्रेण्ड आहे. वजन कमी करायचं असेल तर कार्ब्स कमी करा असं आपण नेहमीच ऐकतो. ते ऐकून मग पोळी, भात खाणंही सोडतो. पण तरीही वजन काही कमी होत नाही. वजनात जी वाढ व्हायची ती होतच असते. शिवाय आपलंही पोट पुर्ण भरत नाही. त्यामुळे आपणही समाधानी नसतो. असंच काहीसं तुमचंही हाेत असेल तर आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला एकदा वाचाच (weight loss tips).. त्यांच्यामते कार्ब्स नाही तर अन्य काही पदार्थांमुळे तुमचं वजन वाढतं. ते नेमकं काय आहे ते पाहा..(Do carbs lead to weight gain?)

 

कार्ब्स खाऊन खरंच वजन वाढतं का?

वजन वाढण्यासाठी खरंच कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ एवढे कारणीभूत ठरतात का याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

घरकामातूनच व्यायाम होतो- जीम, योगाची काय गरज; असं तुम्हालाही वाटतं? बघा हे योग्य आहे की....

यामध्ये त्या सांगतात की भात, पोळी असे कार्ब्सयुक्त पदार्थ खाऊन वजन वाढत नाही. पण जेव्हा तुम्ही ते पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाता तेव्हा त्यातून ज्या जास्तीच्या कॅलरी पोटात जातात त्या वजनवाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना तो प्रमाणात खा. त्याचा अतिरेक टाळा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

कार्ब्स असणारे कोणते पदार्थ खावे आणि कोणते टाळावे?

आहारतज्ज्ञ सांगतात की धान्य, फळं आणि भाज्या यांच्यासारखे कॉम्प्लेक्स कार्ब्स असणारे पदार्थ खायला हरकत नाही. कारण या पदार्थांमध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मग पुढे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि खूप खा खा होत नाही.

कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील

त्याचप्रमाणे रिफाईन कार्ब्स असणारे शुगरी ड्रिंक्स, डेझर्ट्स असे पदार्थ खाणं टाळावं. या पदार्थांमधून खूप जास्त कॅलरी पोटात जातात. शिवाय ते पदार्थ खाऊन पोट भरत नसल्याने पुन्हा लगेच भूक लागते आणि जास्त खाल्ले जाते. त्यामुळे सरसकट कार्ब्स खाणं बंद करण्यापेक्षा अशा पद्धतीने त्याचं विभाजन करून काय खावं आणि काय टाळावं ते पाहा.. 


 

Web Title: Do carbs lead to weight gain? simple weight loss tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.