Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?

केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?

Can Diabetics Eat Bananas?: वजन वाढेल किंवा रक्तातील साखर वाढेल म्हणून अनेक जण केळी खाणं टाळतात. पण असं करणं खरंच कितपत योग्य आहे?(Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 13:09 IST2025-01-10T13:08:26+5:302025-01-10T13:09:03+5:30

Can Diabetics Eat Bananas?: वजन वाढेल किंवा रक्तातील साखर वाढेल म्हणून अनेक जण केळी खाणं टाळतात. पण असं करणं खरंच कितपत योग्य आहे?(Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain?)

Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain, Can Diabetics Eat Bananas? | केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?

केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?

Highlightsकेळी खाण्याचे एवढे फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे काही जण तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्ती केळी खाणं टाळतात.

केळी हे असं एक फळ आहे जे १२ महिने उपलब्ध असतं आणि शिवाय त्याची किंमत इतर फळांच्या तुलनेत कमीच असते. गरिबांचं फळ म्हणून ओळखली जाणारी केळी मात्र पौष्टिक गुणांच्या बाबतीत राजा आहे.. कारण केळीमधून भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. व्यायाम करण्यापुर्वी किंवा केल्यानंतर, ट्रेकिंगसाठी जाताना किंवा मग एखादा मैदानी खेळ खेळण्यापुर्वी केळी खावी, असा सल्ला दिला जातो. कारण केळीमधून भरपूर एनर्जी मिळते. पण केळी खाण्याचे एवढे फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे काही जण तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्ती केळी खाणं टाळतात (Can Diabetics Eat Bananas?). कारण केळी खाऊन वजन आणि रक्तातील साखर वाढते असं त्यांना वाटतं.(Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain?)

 

केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर वाढते?

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खरंच केळी खाणं टाळावं का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोच. त्याविषयी सांगताना आहारतज्ज्ञ शालिनी सुधाकर असं सांगतात. की केळी खाल्ल्यामुळे लगेचच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

डाएटिंग तर करता पण ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही कसं ओळखाल? एक्सपर्ट सांगतात ३ टिप्स..

कारण केळीमध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असतात. हेच फायबर केळीमधून शरीराला मिळणारी साखर रक्तात मिसळण्याची क्रिया बरीच सावकाश करतात. त्यामुळे केळी खाल्ली आणि लगेच रक्तातील साखर वाढली असं होत नाही. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ठराविक वेळेत आणि ठराविक प्रमाणात केळी खाल्ली तर काही हरकत नाही. दोन जेवणांच्या मधला वेळ किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण यांच्यामधला वेळ केळी खाण्यासाठी योग्य आहे. 

 

केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं का?

एनटीडीव्हीने दिलेल्या माहितीनुसार डॉ. शिल्पा अरोरा असं सांगतात की वजन कमी करण्यासाठी तुम्ही केळी खाणं पुर्णपणे टाळत असाल तर ते चुकीचं आहे.

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिता? तब्येतीवर होऊ शकतो वाईट परिणाम- सावध व्हा..

कारण केळीमध्ये जे काही फायबर असतात ते तुमची चयापचय क्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात. चयापचय चांगलं झालं तर आपोआपच पचन क्रिया चांगली होते. त्यामुळे वजन कमी करत असलात तरी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन ठराविक प्रमाणात केळी खाण्यास हरकत नाही. 

 

Web Title: Do Bananas Spike Blood Sugar and responsible for weight gain, Can Diabetics Eat Bananas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.