बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड, ताण आणि मानसिक चिंता याचा आपल्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. (Weight Loss Tips) या सर्व सवयींमुळे आपलं वजन देखील भराभर वाढतं. आपण व्यायाम, योगा आणि डाएट करतो परंतु, कितीही काही केलं तरी वजन काही कमी होत नाही. वाढत्या वजनावर योग्य व्यायामासह आहारात देखील बदल करायला हवा. (Simple Indian fat burning foods)
वजन कमी करण्यासाठी स्वयंपाकघरात वापरला जाणारा भारतीय मसाला हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो.(Natural belly fat reduction) पदार्थाला चव आणण्यापासून आरोग्याच्या अनेक तक्रारीवर ही हिरवीगार पाने फायदेशीर ठरतात. कढीपत्ता हा फक्त फोडणी देण्यासाठीच नाही तर त्याच्या चवीसाठी देखील ओळखला जातो.(Curry leaves for weight loss) याचे नियमित सेवन केल्याने आपले वजन नियंत्रणात राहू शकते. कढीपत्त्याचे वजन कमी करण्यासाठी फायदे कसे होतात पाहूया.
ChatGPT ची कमाल! पठ्ठयानं दीड महिन्यात केलं ११ किलो वजन कमी, AI ने सांगितलं ४ पदार्थ खाऊ नकाच..
कढीपत्त्यामध्ये कार्बाझोल आणि अल्कलाइन गुणधर्म आहेत. जे वजन लवकर कमी करण्यास मदत करतात. जर आपण रोज रिकाम्या पोटी ५ ते ७ पाने कढीपत्त्याची चावून खाल्ली तर आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईलच पण अशुद्धता देखील दूर होते. वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने आणि पाणी घालून त्याचा चहा प्या. यामुळे महिन्याभरात वजन कमी होईल.
कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अल्कलॉइड्स घटक असतात जे आपल्या शरीरातील चयापचय सुधारतात ज्यामुळे वजन कमी होते. कढीपत्ता चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. यात मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स आणि तांबे असते, ज्यामुळे तुमचे वजन लवकर कमी होते. मधुमेह असणाऱ्या लोकांना रोज ही पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहिल. तसेच कोलेस्टेरॉलचा धोका कमी होईल. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता फायदेशीर आहे.