Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार..

जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार..

Kusha Kapila weight loss journey: Kusha Kapila stomach TB: Kusha Kapila health transformation: Bollywood actress weight loss 2025 : अत्यंत कमी कॅलरीज, पुरेसा आहार न घेतल्याने वजन तर कमी झाले पण त्याचा परिणाम स्नायूंवर झाला, ज्यामुळे शरीर कमकुवत झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 11:44 IST2025-06-03T11:43:54+5:302025-06-03T11:44:33+5:30

Kusha Kapila weight loss journey: Kusha Kapila stomach TB: Kusha Kapila health transformation: Bollywood actress weight loss 2025 : अत्यंत कमी कॅलरीज, पुरेसा आहार न घेतल्याने वजन तर कमी झाले पण त्याचा परिणाम स्नायूंवर झाला, ज्यामुळे शरीर कमकुवत झाले.

content creator Bollywood actress kusha Kapila reveals weight loss journey suffered from stomach TB contains 800 calories in food | जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार..

जीममध्ये तासंतास व्यायाम करणं अभिनेत्रीला पडलं महागात, वेटलॉसही ठरला जीवघेणा प्रकार..

काहींना बारीक व्हायचं असतं तर काहींना जाड... या वजन वाढवण्याच्या आणि कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये आपला जीव नकोसा होतो. (weight loss journey) वाढत्या वजनामुळे आपल्याला अनेकदा ट्रोलही केलं जातं. कुटुंब, नातेवाईक- मित्र परिवार यांच्याकडून नेहमीच आपल्याला ऐकावं लागतं.(Kusha Kapila stomach TB) 
वजन कमी करणं, ट्रांसफॉर्मेशन आणि जीममध्ये तासंतास घाम गाळणं किंवा स्वत:ला फिट ठेवणं  हे बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्रीला करावं लागतं.(Kusha Kapila health transformation) त्याच्या वेट लॉसचा प्रवास नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.(Bollywood actress weight loss 2025) कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री कुशा कपिला हिने आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. तिचं ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. परंतु, वजन लवकर कमी करण्यासाठी ओझेम्पिक सारखी औषधे खाल्ली की, काय? असा प्रश्न अनेकांना पडला. (Stomach TB recovery story)

'या' आजाराने समंथा ग्रस्त, वजनही होतंय भरभर कमी, चाहत्यांना ओळखूही येईना...


सोशल मीडियावर तिने व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती रोज फक्त ८०० ते ९०० कॅलरीज असणारा आहार घेतला. तिने सांगितले की, दहावीत असताना माझे वजन अचानक वाढले. यामुळे मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली, मला ट्रोल करण्यात आलं. तेव्हा आईने मला जिममध्ये पाठवलं. यामुळे माझं वजन २० ते २२ किले कमी झालं. या प्रक्रियेत मला अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. ती म्हणते की, २२ वर्षांची झाले तेव्हा माझं वजन पुन्हा वाढलं. पुन्हा स्वत:कडे लक्ष द्यायचे म्हणून मी पुन्हा जीमला जाऊ लागले. दिवसाला ८०० ते ९०० कॅलरीज असणारे पदार्थ खाल्ले. अत्यंत कमी कॅलरीज, पुरेसा आहार न घेतल्याने वजन तर कमी झाले पण त्याचा परिणाम स्नायूंवर झाला, ज्यामुळे शरीर कमकुवत झाले. 


कमी कॅलरीजमुळे तिला पोटाचा गंभीर आजार झाला. सतत ताप येणे आणि पोटदुखी उद्भवली, यामध्ये तिला पोटाचा क्षयरोग जडला. शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या समस्या उद्भवतात. कुशा म्हणते, वजन कमी करण्याचा हा प्रवास जीवघेणा ठरला होता. परंतु जर आपल्यापैकी कुणी वजन कमी करत असेल तर डॉक्टरांचे मत घ्या, वजन कमी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकाच शरीराला पोषण आहार मिळणे देखील गरजेचे आहे. त्यावर आपण लक्ष द्यायला हवे. 

Web Title: content creator Bollywood actress kusha Kapila reveals weight loss journey suffered from stomach TB contains 800 calories in food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.