Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटाचे टायर झाले? सकाळी उठल्यावर करा ' या' ५ गोष्टी, बेली फॅट होईल झरझर कमी- चेहराही चमकेल

पोटाचे टायर झाले? सकाळी उठल्यावर करा ' या' ५ गोष्टी, बेली फॅट होईल झरझर कमी- चेहराही चमकेल

Belly fat loss tips : Morning routine for weight loss: Reduce belly fat naturally: Face glow tips home remedies : मांड्यांवरची चरबी, सुटलेले पोट कमी करण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी करायला हव्या जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 13:51 IST2025-08-24T13:51:05+5:302025-08-24T13:51:40+5:30

Belly fat loss tips : Morning routine for weight loss: Reduce belly fat naturally: Face glow tips home remedies : मांड्यांवरची चरबी, सुटलेले पोट कमी करण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी करायला हव्या जाणून घेऊया.

Best morning routine to reduce belly fat naturally Home remedies for glowing skin and flat stomach | पोटाचे टायर झाले? सकाळी उठल्यावर करा ' या' ५ गोष्टी, बेली फॅट होईल झरझर कमी- चेहराही चमकेल

पोटाचे टायर झाले? सकाळी उठल्यावर करा ' या' ५ गोष्टी, बेली फॅट होईल झरझर कमी- चेहराही चमकेल

'मी काही जंक फूड खात नाही', तरी देखील माझं वजन भराभर वाढतं? असा प्रश्न तुम्हालाही वारंवार सतावतो का?(Belly fat loss tips) वाढते वजन, बदलेली जीवनशैली, जंकफूड, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.(Morning routine for weight loss) आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या किंवा ताण वाढला आणि हार्मोन्समध्ये बदल झाले की वजन वाढू लागते.(Reduce belly fat naturally) अनेकदा पाणी न प्यायल्याने, अनियमित जेवणं आणि साखरेचे किंवा मैद्याच्या पदार्थांमुळे वजन झपाट्याने वाढतं. (Face glow tips home remedies )
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण खाण्यापिण्यासह, व्यायाम आणि डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केले तर फायदा होईल. मांड्यांवरची चरबी, सुटलेले पोट कमी करण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी करायला हव्या जाणून घेऊया.(weight loss tricks) डॉक्टरांच्या मते हा उपाय केल्याने आपले हार्मोन्स सुधारण्यास आणि त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. सलग २१ दिवस हा उपाय केल्यास आपल्याला फायदा होतो. 

कोथिंबीर लवकर सडते - पाने पिवळी पडतात? सोपी ट्रिक, आठवडाभर फ्रीजशिवाय राहिल ताजी-हिरवीगार

1. झोपेतून उठल्यानंतर मनुका आणि केशरचे पाणी प्यायल्याने आपले आरोग्य सुधारते. यासाठी ६ ते ७ काळे मनुके आणि २ केशरच्या काड्या रात्रभर कोमट पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या आणि मनुके चावून खा. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. शरीरातील लोह वाढेल. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि हार्मोनल आरोग्य सुधारते. 

2. सकाळच्या दिनचर्येत कपालभाती आणि ४-७-८ श्वासोच्छवासाचे व्यायम करा. १ मिनिटे कपालभाती आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने चयापचय गतिमान होते. पेशींना ऑक्सिजन मिळते आणि कॉर्टिसोल कमी होतो. ज्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. 

3. आंघोळीपूर्वी १ मिनिट ड्राय ब्रशिंग करा. यामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज उत्तेजित होते ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होते. रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा घट्ट होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक देखील मदत करते. 

4. नाश्त्यापूर्वी ड्रिंक प्या. यासाठी आपल्याला ½ कप पपई, 1 टीस्पून चिया सीड्स आणि चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करुन रिकाम्या पोटी खावे लागेल. यामुळे आतड्यांतील मायक्रोबायोम वाढते आणि पचनक्रिया सुरळीत होते. पोटफुगी रोखून त्वचेच्या समस्या कमी होतात. 

5. सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्सचे पाणी प्या. यासाठी आपल्याला ग्लासभर पाण्यात १ चमचा चिया सीड्स रात्रभर भिजवावे लागतील. हे पाणी सकाळी प्या. यामुळे पोट भरलेले राहिल.ज्यामुळे भूक लागणार नाही. 

Web Title: Best morning routine to reduce belly fat naturally Home remedies for glowing skin and flat stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.