वाढतं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न सध्या अनेकांना छळतो आहे. त्यासाठी कोणी जीमला जाऊन नियमितपणे व्यायाम करतं, तर कोणी डाएट करण्यावर भर देतं. जे लोक खूप शिस्तशीर आहेत ते व्यायाम आणि डाएट या दोन्ही गोष्टींवर भर देतात. पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी पुढे सांगितलेल्या अगदी साध्या सोप्या २ गोष्टी करून पाहा. या गोष्टी मुळीच अवघड नाहीत. त्यामुळे त्याचा ताण येत नाही आणि ठरवलं तर कोणीही ते नक्कीच अगदी सहजपणे करू शकतं. त्या २ वेटलॉस टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहुया..(2 simple tips for weight loss)
वजन कमी करण्यासाठी कोणत्या २ गोष्टी कराव्या?
१. भूक असेल तेव्हाच खा
हा साधा सोपा नियम तर आपण नक्कीच पाळू शकतो. याविषयी माहिती देणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणतात की बऱ्याच लोकांना गरज नसताना सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय असते.
'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...
उगाच बोअर झालं म्हणून खा काहीतरी असं होतं.. ऑफिसमध्ये किंवा घरीही काम करताना त्यांना तोंड नेहमीच चालू ठेवण्याची सवय असते. यामुळे गरज नसताना कित्येक कॅलरी पोटात जातात आणि वजन वाढतं. म्हणूनच हा नियम कटाक्षाने पाळा आणि भूक असेल तेव्हाच खा..
२. आहार कमी करा
एकदमच कडक डाएटिंग करायला गेलात किंवा आहारातले गोड पदार्थ एकदमच कमी करायला गेलात तर ते तुम्हाला कठीण जाईल. हे फार फार तर तुम्ही आठवडाभरच करू शकता.
महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी
म्हणूनच असं काही करण्यापेक्षा हळूहळू जेवण कमी करा. रोज ३ पोळ्या खात असाल तर २ पोळ्यांवर या. असा हळूहळू आहार कमी करा. यामुळे तुम्हाला ताण येणार नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होईल. काही दिवस हा प्रयोग करून पाहा. नक्कीच वजन कमी होईल.
