वयाचा एक ठराविक टप्पा गाठला की वजन वाढीची समस्या अनेकांना छळू लागते. महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाळंतपणानंतर कित्येकींचं वजन वाढतं. त्या काळात जे वजन वाढलेलं असतं ते कमी करण्यासाठी वेळीच प्रयत्न केले नाहीत तर वाढलेलं वजन कमी होत नाही. याचसोबतच शारिरीक समस्या, व्यायामाचा अभाव, बैठं काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी या गोष्टींचाही परिणाम वजनावर होतोच. पण त्यासोबतच २ चुका महिलांकडून हमखास होतात आणि त्या वजन वाढण्यासाठी बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरतात. त्या चुका कोणत्या ते पाहा आणि तुम्हीपण त्याच करत आहात का हे तपासून घ्या...(2 Mistakes Responsible for Weight Gain in Women)
महिलांचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या २ प्रमुख चुका
सगळ्या कुटुंबाच्या खाण्यापिण्याची काळजी घेणाऱ्या महिला स्वतःच्या तब्येतीकडे आणि खाण्यापिण्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. नवऱ्याला, मुलांना वेळेवर नाश्ता देतात. पण स्वतः मात्र नाश्ता करणं विसरून जातात. काही जणींना वाटतं त्यांना नाश्ता करण्याची गरजच काय.. पण हे अगदी चुकीचं आहे.
दाल मखनी म्हणजे फक्त भरपूर बटर नाही, घ्या अस्सल पंजाबी रेसिपी- चवीला लय भारी...
रात्रीचे जेवण ते नाश्त्याची वेळ यामध्ये जवळपास १२ ते १४ तासांचा गॅप झालेला असतो. पोटामध्ये ॲसिड तयार होतं. जर वेळेवर नाश्ता केला नाही तर ते ॲसिड वाढतं आणि यातूनच अनेकांना ॲसिडिटी, चिडचिड होणे, डोकं दुखणं, अशक्तपणा असे त्रास होतात. नाश्ता न केल्याने भूक लागते आणि दुपारी भरपेट जेवण केलं जातं. याचा परिणाम वजन वाढीवर होतो.
वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर असं चारीठाव भरपेट जेवण झाल्यानंतर अनेकींना दुपारी झोप घेण्याची सवय असते. दुपारी वामकुक्षी किंवा डुलकी घेणं हे योग्य आहे.
पांढरे केस काळे होतीलच, पण डोक्यांतला कोंडाही कमी होईल- घ्या कमालीचा 2 in 1 उपाय...
पण अनेकजणी दुपारी २- ३ तास झोप काढतात. पोटभर जेवण आणि त्यानंतर दुपारची झोप यामुळे पचनक्रिया बिघडते आणि त्याचा परिणाम वाढत्या वजनावर होतो. म्हणून सकाळचा नाश्ता टाळणे आणि दुपारी २ ते ३ तासांची झोप घेणं या दोन्ही गोष्टी टाळायला हव्या.
