Join us

लग्न जवळ आलं पण चेहऱ्यावर ग्लो नाही? ‘हा’ फेसपॅक लावा, काही मिनिटांत चेहरा चमकेल सोन्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 15:16 IST

bridal glow face pack : homemade bridal face mask : लग्नाच्या तयारीत पार्लरला जायला वेळच नाही, वापरुन पाहा घरगुती फेसमास्क चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो...

लग्न...हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण! लग्नाची तयारी, खरेदी, सजावट, पाहुणे आणि खास करून 'लूक' या सगळ्याची लगबग सुरू होते. यंदा लग्नाच्या सिझनमध्ये तुम्ही जर नवरी असाल तर, लग्नात चेहऱ्यावरचा खास ब्रायडल ग्लो खूप महत्वाचा असतो. लग्नाच्या तयारीत बरेचदा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करण्यासाठी वेळ नसेल किंवा तुम्हाल लग्नात नॅचरल चमक व ग्लो हवा असेल तर एका घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो(homemade bridal face mask).

आपल्या लग्नात प्रत्येक नवरीला आपला चेहरा ताजातवाना, उजळ आणि ग्लोइंग दिसावा असं वाटतं. पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंट्सशिवायही तुम्ही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने घरच्याघरी ब्रायडल ग्लो मिळवू शकता. लग्नाच्याआधी त्वचेला खास उजळ आणि तजेलदारपणा देण्यासाठी हा घरगुती फेसमास्क खूपच फायदेशीर ठरतो. तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने, अगदी इन्स्टंट ग्लो देण्यासाठी आणि तुम्हाला 'त्या' खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी हा ब्रायडल फेसमास्क (bridal glow face pack) नक्की वापरुन पाहा. हा मास्क वापरून बघा आणि पाहा चेहऱ्यावर येईल मस्त ब्रायडल ग्लो... 

लग्नाआधी चेहऱ्यावर हवाय मस्त ब्रायडल ग्लो... 

लग्नाआधी चेहऱ्यावर हवाय इन्स्टंट ब्रायडल ग्लो यासाठी, फेसमास्क तयार करण्यासाठी १/२ कप कोमट दूध, संत्र्याची ताजी सालं, १ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून भाजून घेतलेली हळद इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

मेहेंदी भिजवताना त्यात घाला ५ रुपयांची ही छोटीशी गोष्ट, केसांना सुंदर बर्गंडी-लाल रंग मिळेल महागड्या पार्लरसारखा...

शरारा पॅण्ट्सचा गजब ट्रेंड, लग्न असो किंवा पार्टी तुमचाच लूक दिसेल सगळ्यात कातील...

फेसमास्क घरच्याघरीच तयार करण्यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे. दूध गरम झाल्यावर त्यात ताज्या संत्राची साल घालावी. हे मिश्रण हलकेच मंद आचेवर व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात ओतून ते एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी यात प्रत्येकी १ टेबलस्पून तव्यावर कोरडी भाजून घेतलेली हळद आणि बेसन घालावे. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. घरगुती इन्स्टंट ब्रायडल ग्लो फेसमास्क चेहऱ्यावर लावण्यासाठी तयार आहे. 

हा ब्रायडल ग्लो फेसमास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे... 

१. दूध :- दूध त्वचेला ओलावा आणि पोषण देऊन कोरडेपणा कमी करते, तसेच नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्यास मदत करते.

२. संत्र्याची साल :- संत्र्याची साल नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग आणि काळे डाग कमी होऊन त्वचा चमकदार होते.

३. हळद :- हळद तिच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेवरील सूज, मुरुमे कमी करून चेहऱ्याला गोल्डन ग्लो देते.

४. बेसन :- बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, डेड स्किन काढून टाकून त्वचेचे पोर्स आतून स्वच्छ करते आणि इन्स्टंट ग्लो देते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bridal glow face pack: Get radiant skin before your wedding.

Web Summary : Want a bridal glow? This homemade face pack uses milk, orange peel, turmeric, and gram flour to brighten and rejuvenate skin naturally before your big day. It reduces tan, dark spots and gives you that instant glow.
टॅग्स :शुभविवाहब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजीघरगुती उपाय