Join us

ChatGPT ची कमाल! पठ्ठयानं दीड महिन्यात केलं ११ किलो वजन कमी, AI ने सांगितलं ४ पदार्थ खाऊ नकाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2025 17:57 IST

Foods to avoid for weight loss: ChatGPT health tips: Weight loss using AI: एका व्यक्तीने AI च्या मदतीने वजन कमी केले आहे. ना त्याने जीम लावली, ना त्यांने काही नवीन गोष्टी केल्या.

ठळक मुद्दे५६ वर्षाच्या युट्यूबरने चॅटजीपीटीच्या मदतीने ४६ दिवसांमध्ये ११ किलो वजन कमी केलं. इतकेच नाही तर त्याने बॉडी देखील बनवली.

मागच्या काही वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.(ChatGPT trend) लवकरच माणसांची जागा टेक्नॉलॉजी घेईल असं देखील म्हटलं जात आहे. सध्या चर्चेचा आणि अल्पवधी काळात लोकप्रिय झालेला विषय म्हणजे ChatGPT. हा AI आपल्या अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. (youtuber lost 11 kg) चॅटजीपीटीने घिबली स्टाइल पोर्टेट तयार केलं आणि अवघ्या काही क्षणात त्याची लोकप्रियता वाढली.(Diet tips from ChatGPT) कामाच्या ठिकाणी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. परंतु, सर्वसामान्यपर्यंत त्याची क्रेझ पोहोचली नव्हती.(Fast fat loss routine) आपण या AI टूलला कमांड दिली की तो आपल्याला सहज उत्तरे देतो. अगदी घरं कसं सजवायचं, बजेट कसं मॅनेज करायचं, आजारी पडल्यानंतर काय करायचं किंवा अगदी जेवण कसं बनवायचं याविषयी माहिती देखील चॅटजीपीटी आपल्याला देते.(What not to eat for weight loss) अशातच एका व्यक्तीने AI च्या मदतीने वजन कमी केले आहे. ना त्याने जीम लावली, ना त्यांने काही नवीन गोष्टी केल्या. वयाच्या ५६ व्या वर्षी त्याने चॅटजीपीटीच्या मदतीने ११ किलो वजन कमी केलं. (ChatGPT weight loss success)

हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात ६ लक्षणं, डॉक्टर सांगतात दुर्लक्ष करु नका, गाठावं लागेल थेट हॉस्पिटल..

५६ वर्षाच्या युट्यूबरने चॅटजीपीटीच्या मदतीने ४६ दिवसांमध्ये ११ किलो वजन कमी केलं. इतकेच नाही तर त्याने बॉडी देखील बनवली. AI ला त्याने काही प्रश्न विचारले, कमांड दिली आणि त्यानुसार त्याने आपली दिनचर्या आखली. वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा?, कोणते पदार्थ खायला हवे?, स्लिम होण्यासाठी काय खाऊ नये?, यांसारखे विविध प्रश्न त्याने विचारले. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या वृत्तानुसार तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह पॅसिफिक वायव्य भागात वास्तव्य करतात. 

मिडिया रिपोर्टनुसार ५६ व्या वर्षी या तरुणाला आपल्या वजनाविषयी मनात न्यूनगंड निर्माण झाला. वजन कमी करण्यासाठी त्याने चॅटजीपीटीची मदत घेतली. त्याने सांगितले की, AI च्या मदतीने त्याने ९५ किलोवरुन ८३ किलोवर त्याचे वजन आले. मी जिमवर अधिक पैसे खर्च केले नाहीत. त्याऐवजी घरात वर्कआउट केले. यात मी डिप बार, पुल अप बार, रेझिस्टन्स बँड, केटबेल्स आणि वेट व्हेस्ट सारख्या गोष्टी केल्या. एआयच्या मदतीने त्याने डाएट प्लान तयार केला. 

ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..

आहारात त्याने कडधान्यांना प्राधान्य दिले. शरीराला हायड्रेट केले, झोपेची गुणवत्ता सुधारली, पूरक आहार घेतला आणि व्यायामावर भर दिला. भरपूर प्रोटीन असलेला नाश्ता आणि रात्रीचे लवकर जेवण करायला त्याने सुरुवात केली. ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळाली. आहारामध्ये अंडी, मीट, ओट्स, मीठ , ऑलिव्ह ऑइल आणि एवोकॅडोचा समावेश केला. साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि दुग्धजन्य पदार्थ त्याने खाणं बंद केलं. यासोबतच पुरेशी झोप घेणे, मानसिक ताण कमी करणं आणि दिवसभरात ८ ग्लास पाणी पिण्याची सवय त्याने स्वत:ला लावली.  

टॅग्स :सोशल व्हायरलवेट लॉस टिप्स