चपलेमुळे पायाला पडलेले चट्टे, डाग, काळे ठसे पटकन दिसून येतात. अनेकांच्या पायावर असे डाग असतात. कारणे विविध असली तरी योग्य उपचाराने ते कमी करता येतात. (your feet will become soft and smooth, slippers can cause damage to feet skin, see how to treat it)चपलांमधून घर्षण, गरम हवामान, धूळ, सगळ्याच गोष्टी आरामात पायांना लागतात त्यामुळे पाय डागाळतात. त्यामुळे त्वचा काळसर होते आणि कधीकधी चट्टेही पडतात. यासाठी घरगुती व नैसर्गिक उपाय प्रभावी ठरू शकतात आणि काही वैद्यकीय उपायही गरजेचे असू शकतात.
सर्वात आधी चपलेमुळे होणार्या चट्ट्यांची कारणं समजून घेणं आवश्यक आहे. जर चपल अगदी घट्ट असेल, तर ती एकाच ठिकाणी वारंवार घासत राहते. घट्ट चपलेमुळे पायावर रक्त साकळते आणि त्यामुळे लाल चट्टा तयार होतो. तसेच घट्ट चपलेमिळे त्वचेलाही त्रास होतो. जर चपल योग्य आकाराची नसेल किंवा चपलेचा प्रकार त्वचेला सूट होत नसेल, तर चट्ट्यांचे प्रमाण वाढू शकते.
या चट्ट्यांना घालवण्यासाठीचपल योग्य वापरणं गरजेचं आहे. तसेच चपल जरा सैल असावी. अगदीच सैल चपलेतून पडायला होईल. मात्र चपलेत पाय आरामात राहील एवढी तरी चपल असायलाच हवी. रबराची, जाड पट्टा असलेली आणि प्लास्टीकच्या पट्ट्यांची चपल वापरणे टाळा. उन्हामुळे वाढलेले चट्टे कमी करण्यासाठी काही अगदी सोपे उपाय पुढीलप्रमाणे:
१. बेसन आणि दुधाचा लेप लावा. बेसन, हळद, आणि कच्चं दूध मिसळून पायावर लावा. १५-२० मिनिटे राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने चोळा आणि मग धुवा. याने त्वचेतील मृत पेशी निघतात आणि रंग उजळतो.
२. लिंबाचा रस आणि मधाचा लेप लावायचा. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत. लिंबाचा रस आणि मध एकत्र करून त्या चट्ट्यांवर लावा. १०-१५ मिनिटे ठेवून द्यायचे मग स्वच्छ धुवायचे. यामुळे काळसरपणा कमी होतो.
३. कोरफड लावण्याचाही फायदा होतो. रोज रात्री झोपण्याआधी चट्ट्यावर अॅलोवेरा जेल लावल्यास त्वचेचा रंग छान होतो तसेच सूजही कमी होते.
४. बटाट्याचा रस लावणे एकदम मस्त उपाय आहे. बटाट्याचा रस नैसर्गिक स्किन लाइटनिंग एजंट आहे. कापलेला बटाटा थेट चट्ट्यावर चोळा किंवा त्याचा रस लावा. नियमित वापरल्यास फरक दिसून येतो.
५. चांगले मॉइश्चरायझर वापरायचे. पायाला सतत कोरडेपणा आणि घर्षण होत असल्यामुळे त्वचा अधिक काळसर होते. यासाठी चांगल्या दर्जाचा मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक आहे. कोको बटर किंवा शिया बटर असलेले क्रीम्स यासाठी उपयुक्त ठरतात.