Lokmat Sakhi >Social Viral > 'देवा श्री गणेशा'....नायजेरियन मुलींचा तूफान डान्स व्हायरल, पाहाल तर जागेवरून उठून नाचाल...

'देवा श्री गणेशा'....नायजेरियन मुलींचा तूफान डान्स व्हायरल, पाहाल तर जागेवरून उठून नाचाल...

Nigerian Girl Viral Dance : मुलींनी 'अग्निपथ' सिनेमातील 'देवा श्री गणेशा' गाण्यावर आपली अदाकारी दाखवत तूफान आणि जबरदस्त डान्स केलाय. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:47 IST2025-08-26T11:46:26+5:302025-08-26T11:47:11+5:30

Nigerian Girl Viral Dance : मुलींनी 'अग्निपथ' सिनेमातील 'देवा श्री गणेशा' गाण्यावर आपली अदाकारी दाखवत तूफान आणि जबरदस्त डान्स केलाय. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Young girls from Nigeria performing to the popular song “Deva Shree Ganesha” goes viral | 'देवा श्री गणेशा'....नायजेरियन मुलींचा तूफान डान्स व्हायरल, पाहाल तर जागेवरून उठून नाचाल...

'देवा श्री गणेशा'....नायजेरियन मुलींचा तूफान डान्स व्हायरल, पाहाल तर जागेवरून उठून नाचाल...

Nigerian Girl Viral Dance : आपल्या सर्वांचा आवडता असा गणेशोत्सव आला आणि लाडक्या बाप्पाच्या गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होणार नाही असं होऊ शकत नाही. वेगवेगळ्या सिनेमांमधील किंवा अल्बममधील गाण्यांवर डान्स शूट करून ते सोशल मीडियावर शेअर केले जातात. जे यूजरना खूप आवडतात. आपण एक अशीही गोष्ट लक्षात घेतली असेल की, केवळ भारतातच नाही तर परदेशातही श्री गणेशाची गाणी लोकप्रिय असतात. एक असाच बाप्पाच्या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे यात नायजेरिअन मुलींच्या एका डान्स ग्रुपनं कमाल डान्स केला आहे.

Dream Catchers Academy या नायजेरियातील डान्स ग्रुपमधील मुलींनी 'अग्निपथ' सिनेमातील 'देवा श्री गणेशा' (Deva Shree Ganesha) गाण्यावर आपली अदाकारी दाखवत तूफान आणि जबरदस्त डान्स केलाय. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गणेश चतुर्थीदरम्यान त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि पाहता पाहता व्हायरल झाला. महत्वाची बाब म्हणजे बाप्पाच्या गाण्यांवरील डान्स तर खूप व्हायरल होत असतात, पण यात मुलींची जी एनर्जी दिसली ती लक्ष वेधून घेणारी आहे.

मुलींचं ड्रेसिंग सुद्धा आकर्षक आणि आक्रामक आहे. ज्यामुळे त्यांचा डान्स अधिकच डोळे दिपवणारा आणि आपल्यालाही ठेका धरायला लावणारा असा आहे. तसे परदेशातील बरेच लोक आजकाल बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करून आपले  व्हिडीओ शेअर करत असतात. पण सध्या सगळीकडे गणेश उत्सवाचं वातावरण आहे आणि त्यात हा व्हिडीओ अधिक लक्षवेधी ठरत आहे.

Web Title: Young girls from Nigeria performing to the popular song “Deva Shree Ganesha” goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.