Join us

दोरीवरच्या उड्या मारू नका, करा बिनधास्त डान्स, पाहा व्हिडिओ- दोरीचा असा उपयोग कधी पाहिलाच नसेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 16:05 IST

Viral Video Of Dance With Jumping Rope: जम्पिंग रोपचा असा भन्नाट वापर तुम्ही याआधी कदाचित बघितलाच नसेल.. बघा कशी भारी नाचतेय ही तरुणी...

ठळक मुद्देसुरुवातीला खाली वाकून आणि नंतर खाली बसून ती एवढ्या जलद गतीने दोरी पायाखालून फिरवते की क्षणभर ती नेमकी कशा पद्धतीने दोरी फिरवते आहे, हेच बघणाऱ्याला समजत नाही.

सोशल मिडियावर काय काय अचाट व्हिडिओ (viral video) बघायला मिळतील, काही सांगता येत नाही. कधी कधी यामध्ये खूपच विनोदी काही तरी असतं तर कधी कधी खरोखरच आपल्याला विचार करायला लावेल असं काही बघायला मिळतं. एक मात्र खरं की सोशल मिडियाच्या माध्यमातून आजकाल अनेक जणांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे, त्यामुळे तरुणांमधीलच काय पण वयस्कर मंडळींमध्ये असणारेही अनेक कलागूण या व्यासपीठाच्या माध्यमातून समाेर येत आहेत. एखाद्या दोरीचा (dance with jumping rope) असा सुंदर उपयोग करून नृत्य करणारी ही तरुणीही त्यातलीच. 

 

सोशल मिडियावर सध्या या तरुणीच्या नृत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. priyu_skipper01 या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रियांका असं या तरुणीचं नाव असून ती खेळाडू आहे. दोरीवरच्या उड्या हा तिचा खेळ असून यात तिने १५ पेक्षाही जास्त सुवर्ण पदकं मिळवली आहेत. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर तिचे एक से एक व्हिडिओ बघायला मिळतात आणि या दोरीचा उड्या मारण्याव्यतिरिक्त असाही वापर करता येतो, हे आपल्या लक्षात येतं. खरोखरच तिने शेअर केलेले सगळेच व्हिडिओ कमाल आहेत.

 

सध्या तिचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात ती एका अतिशय नजाकतीने सुशोभित केलेल्या वास्तूमध्ये उभी आहे. तिथे झुंबर लावून आकर्षक रोषणाई केलेली आहे, आणि त्याठिकाणी ती दोरी हातात घेऊन काला चष्मा या गीतावर सुंदर नृत्य करते आहे. सुरुवातीला खाली वाकून आणि नंतर खाली बसून ती एवढ्या जलद गतीने दोरी पायाखालून फिरवते की क्षणभर ती नेमकी कशा पद्धतीने दोरी फिरवते आहे, हेच बघणाऱ्याला समजत नाही. तिच्या या अफलातून व्हिडिओला आजवर लाखो लाईक्स मिळाले आहेत. 

 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य