How to get rid of flies : पावसाला सुरूवात होताच माशांचा त्रास घराघरांमध्ये वाढतो. घरात सगळीकडेच म्हणजे किचन, हॉल, बेडरूम, कपडे, भांडी सगळ्यांवर माशांचा घोळका बसलेला दिसतो. सतत या माशा चेहऱ्यावर, हातांवर बसून त्रास देतात. काही काम करत असाल त्यातही त्यांची लुडबूड सुरू असते. माशांमुळे वैताग तर येतोच सोबतच तब्येत सुद्धा बिघडते. कारण या माशा कुठून कुठून फिरून येऊन उघड्या अन्नावर किंवा भांड्यांवर बसतात. अनेक कीटाणू आपल्या पोटात जातात आणि मग तब्येत बिघडते. अशात या माशा पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. पण तरी सुद्धा या निर्लज्ज माशा काही पिच्छा सोडत नाहीत. तुम्ही सुद्धा अनेक उपाय करून थकले असाल तर आम्ही तुम्हाला फक्त तीन उपाय सांगणार आहोत. जे करून माशा पळवण्यास मदत मिळू शकेल.
लिंबू आणि मिठाचं पाणी
घरातून माशांचा घोळका पळवून लावण्यासाठी एक खास स्प्रे तयार करू शकता. यासाठी एक कप पाण्यात एका लिंबाचा रस टाका आणि २ चमचे मीठ टाकून चांगलं मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्या ज्या ठिकाणी माशा येऊन बसतात तिथे स्प्रे करा. या मिश्रणाच्या आंबट-खारट टेस्टनं माशा पळून जातील.
मीठ आणि काळी मिरी
माशा पळवून लावण्यासाठी आणखी एक खास उपाय म्हणजे मीठ आणि काळी मिरीचा स्प्रे. हे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका बॉटलमध्ये पाणी भरा. त्यात मीठ आणि काळी मिरी पूड टाका. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घरात स्प्रे करा.
आल्याचं पावडर
आल्याच्या मदतीनं सुद्धा तुम्ही घरातील माशा नेहमीसाठी पळवून लावू शकता. यासाठी एक वाटी पाण्यात एक चमचा आल्याचं पावडर टाका. हे चांगलं मिक्स करा. नंतर स्प्रे बॉटलमध्ये टाकून घरात स्प्रे करा. माशा तुम्हाला दिसणार नाहीत.