World's First AI Hospital: सध्या सगळीकडेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटॅलिजन्सची चर्चा सुरू आहे. एआयद्वारे कामं कशी सोपी होतात किंवा यामुळे नोकऱ्यांवर कशी गदा येणार हे विषय जास्त चर्चेत असतात. अशात बरेच देश एआयचा चांगला फायदा करून घेत आहेत. आता चीनचंच उदाहरण घ्या. नेहमीच वेगळे प्रयोग करणाऱ्या चीननं जगातील पहिलं एआय हॉस्पिटल सुरू केलं आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलचं नाव एजंट हॉस्पिटल असं ठेवण्यात आलं आहे. जे शिंघुआ यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये तब्बल 14 एआय डॉक्टर आणि 4 नर्स आहेत. जे रोज 3 हजारांपेक्षा जास्त रूग्णांवर उपचार करतील.
जगातील पहिल्या एआय हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आजारांचं निदान करणं, त्यावर उपचाराचं प्लानिंग करणं आणि नर्सना रूग्णांची काळजी घेणं या उद्देशानं डिझाइन करण्यात आलं आहे. या हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स लार्ज लॅंग्वेज मॉडलच्या मदतीनं ऑटोनॉमस पद्धतीनं चालतात.
रिसर्चनुसार, हे एआय डॉक्टर जगातील कोणतीही महामारी रोखण्यासाठी आणि त्यावरील उपचाराच्या सूचना देऊ शकतात. तसेच एजंट हॉस्पिटलनं अमेरिकेच्या मेडिकल लायन्सेसिंगच्या परीक्षा प्रश्नांना 93.6 टक्के एक्यूरेसीसोबत उत्तरे दिली आहेत.
एजंट हॉस्पिटलचे लियू यांग यांनी सांगितलं की, या एआय व्हर्चुअल हॉस्पिटलनं मेडिकलच्या विद्यार्थांना देखीळ खूपकाही शिकायला मिळेल. सोबतच लोकांना कमी पैशात अनेक सुविधा मिळतील. याद्वारे जास्तीत जास्त आरोग्या सुविधा मिळू शकतात. पुढील काही दिवसात हे हॉस्पिटल सुरू होणार आहे.
एआय रोबोटचा वापर आधीच सुरू
तुम्ही सोशल मीडियावर अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ बघितले असतील ज्यात तुम्हाला एआय रोबोट पेट्रोल पंपावर फ्यूल भरताना दिसले असतील. बऱ्याच देशांमध्ये फ्यूल भरण्यासाठी एआय रोबोटचा वापर करत आहे. इतकंच नाही तर अनेक हॉटेल्समध्येही एआय रोबोट वापरले जात आहेत. संयुक्त अरब अमीरातच्या अबूधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनीनं गाड्यांमध्ये फ्यूल भरण्यासाठी एआय रोबोट तयार केले आहेत.