Join us

'वर्क फ्रॉम सिनेमा हॉल' चित्रपटगृहात बसून काम करणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल लोकं म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 15:23 IST

'Work from Cinema Hall': Photo of woman sitting in cinema hall and working goes viral, people say... : चित्रपटगृहातही काम चालूच. पाहा नक्की काय प्रकार.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण एवढा वाढला आहे की लोकं सतत लॅपटॉप घेऊन बसलेली दिसतात. ऑफीसवरुन घरी आल्यावरही अनेक जण लॅपटॉपवर काही तरी काम करत असतात. त्यात सध्या जमाना वर्कफ्रॉम होमचा आहे. ('Work from Cinema Hall': Photo of woman sitting in cinema hall and working goes viral, people say...)वर्कफ्रॉम होम या संकल्पनेने काम करण्याची पद्धतीच बदलून टाकली आहे. एकेकाळी ऑफिसपुरते मर्यादित असलेले काम आता घर, कॅफे, ट्रेन किंवा प्रवासात कुठेही सहज करता येऊ लागले आहे. एका अर्थी कामाचे बदललेले हे स्वरुप छान वाटते. मात्र काम कुठूनही करता येत असल्याने त्याचा ताणही तितकाच वाढला आहे.

लॅपटॉप आणि इंटरनेट यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून काम करता येते, त्यामुळे लवचिकता आणि सोय वाढली आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो, वाहतूक कोंडीचा त्रास कमी होतो आणि घरुन काम केल्यामुळे कुटुंबासाठी अधिक वेळ देता येतो. विशेषतः महिलांसाठी आणि लहान मुलांची जबाबदारी सांभाळणाऱ्यांसाठी ही पद्धत फायदेशीर ठरते. ट्रेनमध्ये गाडीमध्ये बसून काम करणारे तर आपण पाहतोच मात्र सध्या चर्चा आहे ती बेंगळूरमधील चित्रपटगृहात बसून काम करणाऱ्या एका महिलेची. सोशल मिडियावर एका चित्रपट पाहायला जाऊन तिथे लॅपटॉपवर काम करणाऱ्या मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे.

मात्र या सोयीसोबत काही अडचणीही निर्माण झाल्या आहेत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन साधणे कठीण झाले आहे. लॅपटॉप नेहमी जवळ असल्याने विश्रांतीचा काळ कमी झाला आहे आणि दिवस-रात्र कामाची अपेक्षा केली जाते. यामुळे डोळ्यांचा ताण, पाठदुखी, झोपेचा त्रास आणि मानसिक तणाव वाढतो. सतत स्क्रीनकडे पाहण्यामुळे थकवा जाणवतो, तर सामाजिक आयुष्यावरही परिणाम होतो.

या फोटोवर अनेकांनी विविध प्रकारची मते मांडली. काहींना मुलगी फक्त लोकांचे लक्ष वेधण्यासाठी असे करत आहे वाटते तर काहींनी त्यांच्यावरही असे काम करायची वेळ येते असा अनुभव सांगितला. स्वतःसाठी जर काही तासही काढता येत नाहीत तर असे काम का करावे किंवा काम करायचेच आहे तर चित्रपटगृहात जाऊन इतरांना का त्रास द्यावा अशा अनेक कमेंट्स या फोटोवर आहेत. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलमहिला