Join us

काकूंचा गारेगार देसी जुगाड फ्रिज नाही तर फॅन लावून केली कुल्फी, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 13:03 IST

Woman's unique style of preparing ice cream has left Anand Mahindra mighty impressed. Watch video फ्रिजशिवाय कुल्फी करणाऱ्या काकूंचा पाहा धमाल जुगाड

भारत हा एक असा देश आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीकडे जुगाडू आयडिया आहेत. काम - चलाव युक्ती लढवून विविध गोष्टी लोकं करतात. सोशल मिडीयावर देखील देसी जुगाडचे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. काही लोकांमध्ये एवढं टॅलेंट असतं, की ते पाहून भलेभल्यांची बोलती बंद होते.

अशाच एका भारतीय महिलेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने फ्रिजचा वापर न करता, फॅनच्या मदतीने थंडगार कुल्फी तयार केली आहे.  हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील या देसी जुगाडचं कौतुक कराल. या भन्नाट अविष्काराचा व्हिडिओ महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. देसी काकूंनी नक्की काय कमालीची शक्कल लढवली पाहूयात(Woman's unique style of preparing ice cream has left Anand Mahindra mighty impressed. Watch video).

या व्हिडिओमध्ये सर्वात आधी एका स्टोव्हवर महिला कुल्फीचं मिश्रण तयार करून घेते. हे मिश्रण त्या एका लंबगोलाकार भांड्यात काढून घेतात, व झाकण घट्ट बंद करतात. त्यानंतर हे भांडे दुसऱ्या मोठ्या भांड्यात ठेवतात. या दोन भांड्यांच्या मधल्या मोकळ्या जागेत त्या बर्फाचे मोठमोठे तुकडे ठेवतात. मग त्या कुल्फीचं भांडं रश्शीच्या साहाय्याने पंख्याला बांधतात. जसा पंखा फिरतो तसे हे भांडे फिरत जाते. हळूहळू कुल्फीचं मिश्रण घट्ट होते. अशा प्रकारे कुल्फी तयार होते. त्यानंतर महिला तयार झालेली कुल्फी एका प्लेटमध्ये काढून दाखवते.

बघावं ते नवलंच! लेकीसह आई, सासू, आजीही गर्भवती, पाहा व्हायरल व्हिडिओची गोष्ट

करोडोंची मालकीण असलेली कंगणा ६०० रुपयांची साडी नेसते आणि म्हणते..

महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना “जिथे इच्छा तिथे मार्ग, हॅन्डमेड व फॅन मेड आईस्क्रीमचा चमत्कार” असे कॅप्शन दिले आहे. हा फॅन मेड आईस्क्रीम पाहून, नेटकरींनी त्या महिलेचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओवर तब्बल ४६ हजार लाईक्स व शेकडो कमेंट्स आहेत. ''भारतीय लोकं मुळात असतातच हुशार. हे असे टॅलेंट देशभर जायला नको'' अशा प्रकारचे कमेंट अनेकांनी पोस्टवर केल्या आहेत. 

टॅग्स :आनंद महिंद्रासोशल व्हायरलसोशल मीडिया