Join us  

Woman marries herself get divorced : अजबच आहे! मॉडलनं स्वत:शीच लग्न केलं अन् घटस्फोटही घेतला; वाचा भानगड आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 7:11 PM

Woman marries herself get divorced Social Viral : एकदा फसवणूक झाल्यानंतर व्यक्तीचा प्रेमावरचा विश्वास उडतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता असंच काहीसं या मॉडेलसोबत घडले आहे.

घटस्फोट आता खूप मोठी गोष्ट राहिलेला नाही आणि तुमच्यासाठी योग्य नसलेल्या व्यक्तीला घटस्फोट देण्यात नक्कीच काही चूक नाही.  कोणतेही कपल्स एकमेकांसोबत सुखानं राहत असतील असल्यानं त्यांच्या नात्यातील गोडवा अधिकच वाढत जातो. पण कधी कधी दोन व्यक्तींमधलं नातं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे टिकत नाही. काही कपल्स  एकमेकांशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांचे नातं तुटते.

एकदा फसवणूक झाल्यानंतर व्यक्तीचा प्रेमावरचा विश्वास उडतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता असंच काहीसं ब्राझिलच्या एका मॉडेलसोबत घडले आहे. जी पुरुषांच्या अशा वागण्याला कंटाळून एकटी राहायला लागली आहे.फसवणूक झाल्यानंतर, तिला समजले की ती एकटीच इतकी सक्षम आहे की तिला कोणाचीही गरज नाही. त्यानंतर त्या महिलेने असा निर्णय घेतला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मॉडेलने स्वतःशी लग्न केले.

ही महिला ब्राझीलमधील साओ पाओलो (Sao Paolo)  येथील रहिवासी आहे. तिचं वय 33 वर्षे आहे. खरं तर, त्यांच्या ब्रेकअपनंतर, तिला खूप एकटं वाटत होतं आणि तिला वाटत होतं की तिला आनंदी राहण्यासाठी आयुष्याच्या जोडीदाराची गरज आहे, परंतु काही काळानंतर तिने ठरवलं की तिला कोणाचीही गरज नाही आणि ती स्वतःशीच लग्न करेल.

रिपोर्टनुसार,  ही मुलगी ख्रिस्ती वेशभूषा करून चर्चमध्ये गेली आणि तिनं लग्न केले. आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तिचा हा निर्णय ऐकून सोशल मीडिया युजर्स खूपच आश्चर्यचकित झाले. यासोबतच लग्नानंतर महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. फॅशन मॉडेलने आधी सांगितले की तिला फक्त एका पुरुषावर अवलंबून राहण्याचा कंटाळा आला होता, म्हणून तिने स्वतःशी लग्न केले. मात्र, आता तीला आता खास व्यक्ती भेटल्यानं तिनं स्वत:शी केलेलं लग्न मोडलं असल्याचा दावा इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केला आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल