lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Mother rubbed chilli powder in son's eyes : १५ वर्षीय मुलाला गांजा ओढत असतानाच आईनं पकडलं; अन् मग घडलं असं काही... पाहा  व्हिडिओ

Mother rubbed chilli powder in son's eyes : १५ वर्षीय मुलाला गांजा ओढत असतानाच आईनं पकडलं; अन् मग घडलं असं काही... पाहा  व्हिडिओ

Mother rubbed chilli powder in son's eyes : आपला मुलगा शाळेत न जाता  गांजा ओढत असल्याचं समजाच; आईनं केलं असं काही; पाहा  व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:11 PM2022-04-05T15:11:14+5:302022-04-05T15:14:56+5:30

Mother rubbed chilli powder in son's eyes : आपला मुलगा शाळेत न जाता  गांजा ओढत असल्याचं समजाच; आईनं केलं असं काही; पाहा  व्हिडिओ

Woman in telangana rubbed chilli powder in son eyes punish him for his ganja addiction | Mother rubbed chilli powder in son's eyes : १५ वर्षीय मुलाला गांजा ओढत असतानाच आईनं पकडलं; अन् मग घडलं असं काही... पाहा  व्हिडिओ

Mother rubbed chilli powder in son's eyes : १५ वर्षीय मुलाला गांजा ओढत असतानाच आईनं पकडलं; अन् मग घडलं असं काही... पाहा  व्हिडिओ

आपल्या मुलांनी चांगलं वागावं, कुटुंबाचं नाव मोठं करावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. जन्मापासूनच आपल्याला मुलाला काहीही कमी पडू नये, त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी ते रक्ताचं पाणी करतात. पण हीच मुलं जेव्हा चुकीच्या मार्गाला जातात तेव्हा आई वडिलांची तळ पायाची आग मस्तकात जाते. तेलंगणातील (Telangana) सुर्यपेट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या मुलाला गांजाचे (Ganja) व्यसन करत पकडल्यानं धक्कादायक शिक्षा दिली. मुलाला खांबाला बांधल्यानंतर महिलेने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.  (Telangana Mother Rubs Chilli Powder on Son's Eyes to Punish for Ganja Addiction)

तेलंगणातील सुर्यपेट जिल्ह्यातील कोडाड येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेलंगणातील ग्रामीण पालक मुलांच्या डोळ्यात मिरची पावडर  टाकण्याचा प्रकार सर्रास करतात. ही काही नवीन गोष्ट नाही. अशा घटना अनेकदा ऐकायला मिळतात.

आपल्या १५ वर्षांच्या मुलाच्या गांजाच्या व्यसनामुळे त्रासलेल्या एका महिलेने त्याला खांबाला बांधले. ती एवढ्यावरच थांबली नाही. त्या महिलेने मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर तो  वेदना असह्य्य झाल्यानं ओरडू लागला. तर काहींनी त्याच्या डोळ्यांवर पाणी टाकण्याचा सल्ला  दिला. गांजा पिण्याची सवय सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतरच महिलेने मुलाला सोडले. तो शाळेच्या वेळेत दांडी मारून गांजाचे व्यसन करायचा  म्हणून आईने त्याला कठोर शिक्षा केली. वारंवार इशारे देऊनही त्याने आईचं ऐकलं नव्हतं.

तेलंगणात डोळ्यात मिरची टाकण्याचा प्रकार काही नवीन नाही

तेलंगणातील ग्रामीण पालकांकडून मुलांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकणे हे काही नवीन नाही.  पण यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले होते. काही नेटिझन्सनी असे सुचवले की हे प्रतिकूल ठरू शकते. तरुणांमधील वाढत्या अंमली पदार्थांचे व्यसन आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांकडून या धोक्याला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ही घटना घडली आहे.

Web Title: Woman in telangana rubbed chilli powder in son eyes punish him for his ganja addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.