Social Viral : जगात असे असे काही आजार आहेत, ज्याबाबत माहिती समोर आल्यावर अचंबित व्हायला होतं. सहजपणे विश्वास बसत नाही. असाही आजार असू शकतो? असा प्रश्न पडतो. काही महिलांच्या चेहऱ्यावर थोडेफार केस असतात. पण चक्क पुरूषांसारखी लांबलचक दाढी कधी पाहिली नसेल. पण “पीकाबू पंपकिन” नावाच्या महिलेला पुरूषांसारखी दाढी आहे.
३९ वर्षीय या महिलेच्या चेहऱ्यावर खासकरून हनुवटीवर लांब केस आहेत. याचं कारण आहे, एक आजार. या केसांना कंटाळून त्या अनेक वर्ष शेव्हिंग करत होत्या. अखेर वैतागून त्यानी असं करणं बंद केलं आणि आता त्याना लांबलचक दाढी आहे. ज्यामुळे त्या सोशल मीडियावर फेमस झाल्यात. सतत वाढणाऱ्या केसांमुळे पीकाबू पंपकिन यानी दाढी ठेवण्याचा साहसी निर्णय घेतला. यामुळे त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं.
काय आहे हा आजार?
पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा आजार तिला झाला आहे. पीसीओएस ही एक हार्मोनल कंडीशन आहे ज्यात चेहऱ्यावर केसांची अधिक वाढ, वजन वाढणे आणि डोक्यावरील केस गळणे अशी लक्षणं दिसतात. पीसीओएस ही एक कॉमन समस्या आहे आणि यूकेमध्ये दर १० पैकी एका महिलेला ही समस्या आहे. यातील अर्ध्यापेक्षा अधिक महिलांमध्ये याची काहीच लक्षणं दिसत नाहीत. याची लक्षणं किशोरावस्थेच्या सुरूवातील दिसू लागतात. या आजारात चेहरा, छाती, पाठ या भागांमध्ये खूप केस वाढतात. सोबतच वजन वाढतं, डोक्यावरील केस विरळ होतात किंवा झडतात. त्वचा तेलकट होते. पीसीओएसनंतर टाइप २ डायबिटीस आणि हाय कोलेस्टेरॉलचा धोकाही वाढू शकतो.
ऑक्टोबर २०२१ च्या पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत त्यांनी दाखवलं की, कशाप्रकारे त्यानी दाढी कापली. ट्रिम केली. त्यानंतर दाढीची काळजी घेणं सुरू केलं.
लोकांना आवडला त्यांचा निर्णय
त्यांच्या एका फॉलोअरनं लिहिलं की, "पीसीओएससोबत चेहऱ्यावरील केस वाढणं असं आहे, ज्यावर आपणं कंट्रोल ठेवू शकत नाही. आपला आत्मविश्वास अद्भुत आहे. आम्हाला आपला अभिमान वाटतो". एका पीसीओएस फॉलोअरनं लिहिलं की, "मलाही इतकी दाढी आली असती तर बरं झालं असतं. मला फक्त मानेवर आणि हनुवटीवर पॅचेस आहेत". अशाप्रकारे पीकाबू पंपकिन यांचा हा निर्णय अनेक महिलांसाठी प्रेरणा सुद्धा ठरत आहे.
पीकाबू पंपकिन यांनी सांगितलं की, आयुष्यात झालेला हा बदल इतकाही सोपा नव्हता. आधी त्यानी रेजर हेअर रिमूव्हल वापरलं. नंतर त्यांनी दाढी वाढवण्याचा निर्णय घेतला. इतकी दाढी वाढवण्यासाठी अनेक वर्ष लागले. आता त्या रोज दाढीवर तेल लावतात. जेणेकरून दाढी चमकदार आणि चांगली दिसावी.