Join us

‘देहाती मॅडम’ची इंग्रजी शिकवणी! डोक्यावर पदर घेऊन फाडफाड इंग्रजी शिकवणारी कोण ‘ती?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2024 13:49 IST

Woman from rural UP teaches English through her YouTube channel, draws widespread praise : नवऱ्याचा मोठा अपघात-घराचा संपूर्ण भार, गावखेड्यातील महिलेची जिद्दीची गोष्ट

सोशल मिडीयात कोण कधी स्टार होईल, सांगता येत नाही. लोकांना कटेण्ट किंवा सादर करण्याची शैली आवडली तर, व्हिडिओ व्हायरल झालाच म्हणून समजा. सोशल मिडिया फक्त शहरी भागात नसून, त्याची मुळं गावाखेड्यापर्यंत पसरली आहे. मुख्य म्हणजे यामुळे शहर आणि गावांमधील अंतर अतिशय कमी झालं आहे. बऱ्याचदा गावाखेड्यात दडलेलं टॅलेण्ट सोशल मिडियामुळे लोकांसमोर आलं आहे (Social Viral).

सध्या अशाच एका महिलेचं टॅलेण्ट नेटकऱ्यांच्या समोर तर आलंच, शिवाय त्या महिलेचं खास कौतुक करण्यात येत आहे (Motivational Story). यशोदा लोधी असं त्या महिलेचं नाव असून, 'देहाती मॅडम' चॅनलद्वारे त्या लोकांना इंग्रजी शिकवतात(Woman from rural UP teaches English through her YouTube channel, draws widespread praise).

गावातील 'देहाती मॅडम' नक्की आहेत तरी कोण?

उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील यशोदा लोधी सोशल मिडीयावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच यूट्यूबवर 'इंग्लिश विथ देहाती मॅडम' नावाचे यूट्यूब चॅनेल असून, आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये त्या लोकांना इंग्रजी बोलण्यासाठी उपयुक्त पडतील अशा टिप्स शिकवतात. पहिल्या पाहण्यात यशोदा लोधी डोक्यावर पदर, कपाळावर बिंदी अशा एखाद्या सामान्य खेडेगावातील स्त्रीसारख्या दिसतात. मात्र, त्यांचे व्हिडिओ पाहून त्या एका प्रोफेशनल प्रोफेसर वाटतात.

करीना म्हणाली, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सैफू! आणि सैफ काय म्हणाला? तीच ती घरोघरचीच कथा..

नवऱ्याचा झाला अपघात, तरीही खचल्या नाही कारण..

यशोदा यांचं बालपण सर्वसाधारण कुटुंबात गेलं. त्या मामाच्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी १२वी पर्यंतचं शिक्षण हिंदी शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांची जोडीदाराशी भेट झाली. मात्र या नात्याला कुटुंबियांचा विरोध होता. विरोध असूनही, यशोदा आणि तिच्या पतीने लग्न करण्याचं ठरवलं.

लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर अर्शद वारसीने लग्न केले रजिस्टर्ड, पण इतक्या उशीरा का?-अर्शद सांगतो..

यशोदा यांचे पती आधी रोजंदारी मजूर होते. २०१९ मध्ये त्यांच्यासोबत मोठा अपघात घडला. अपघातानंतर त्यांना काम करता येत नव्हते. त्यामुळे घरचा भार सांभाळण्यासाठी यशोधाने यूट्यूबची मदत घेतली. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या स्मार्टफोनद्वारे नव्या प्रवासाची सुरुवात केली, आणि या प्रवासात त्यांना यशही मिळाले.

टॅग्स :इंग्रजीसोशल मीडियासोशल व्हायरल