Viral Video : आजकाल भारतात जास्तीत जास्त लोक असे आहेत जे रेल्वेनं प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही अनेकदा रेल्वेनं प्रवास केला असेल. रेल्वेचा प्रवास नेहमीच एक वेगळा अनुभव देणारा असतो. त्यातही जर तुम्हाला विंडो सीट मिळाली तर मग बातच वेगळी. पण तुम्ही कधी रेल्वेतील सीटची सफाई करण्याचा विचार केलाय का? स्लीपरमध्ये तर याबाबत कुणीतरी विचार केला असेलच. पण AC कोचमध्ये प्रवास करणारे या फंद्यात काही पडणार नाहीत. पण AC कोचमधून प्रवास करणाऱ्या एक महिलेचा सीटची सफाई करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक महिला रेल्वेच्या 2AC कोचच्या सीटवर बसण्याआधी सीट स्वच्छ करताना दिसत आहे. सामान्यपणे असं कुणी करत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाले आहेत. सोबतच सफाई करताना जे दिसलं ते पाहून लोक हैराणही झालेत. टिशू पेपर आणि एका लिक्वीडच्या मदतीनं महिलेनं सीट स्वच्छ केली. तेव्हा त्यावर असलेली धूळ-माती स्पष्टपणे दिसली. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे नक्कीच कळेल की, कोच आणि त्यातील सीट किती स्वच्छ असतात.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर housewife_to_homemaker नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ८२ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. व्हिडीओ बघितल्यानंतर एकानं लिहिलं की, 'लोक कंन्टेन्टसाठी रेल्वेची सफाई करत आहेत'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'कधी जनरल कोचमध्येही या'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'तुम्हाला सलाम'. चौथ्यानं लिहिलं की, 'कोपऱ्यात टॅक्स हसत आहे'.