गेल्या काही वर्षात टेक्नोलॉजीचा वापर फार वाढला आहे. आज जेवायला काय करु ते आज वातावरण कसं असेल अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे एआय लगेच देते. ( wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband )असे अगदीच क्वचित प्रश्न असतील ज्याची उत्तरे एआय देऊ शकत नाही. चॅटजीपीटीचा वापर तर आता ऑफीस, शाळा, कार्यालये आदी ठिकाणीही केला जातो. चॅटजीपीटी वापरताना एखाद्या ज्ञानी व्यक्तीशीच गप्पा मारतोय असे वाटते. मध्यंतरी अॅलेक्सा हे फिचर फारच लोकप्रिय झाले होते. तिच्याशी गप्पा मारण्याचे जणू व्यसनच लोकांना लागले होते. तसेच हळूहळू चॅटजीपीचे म्हणणेच बरोबर अशी मानसिकता लोकांची होत आहे, अशा तर्काकडे इशारा करणाऱ्या काही घटना घडत आहेत. त्यापैकीच एक हा प्रकार.
ग्रीसमध्ये फारच विचित्र प्रकार घडला. एका महिलेने कॉफी मग रिडींगसाठी चॅटजीपीटीचा वापर केला. कॉफी मग रिडींग म्हणजे एखाद्या व्यक्तीने ज्या कपात कॉफी प्यायली तो पाहून कॉफी मग रिडर त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगतो. हा प्रकार खरा मानणारे अनेक जण आहेत. तसेच त्याला अंधश्रद्धा मानणारेही अनेक आहेत. आजकाल ऑनलाइन राशीभविष्य वगैरे प्रकार भारतातही जोरदार चालतात. इतरही देशांत असे प्रकार घडतातच. चॅटजीपीटीने त्या महिलेच्या प्रश्नाचे उत्तर देत तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबतही प्रेमसंबंधात आहे असे सांगितल्यावर महिलेने नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. ( wife filed for divorce, she believes in Chat GPT more than her husband )लग्नाला १२ वर्षे झाल्यानंतरही चॅटजीपीटीने नवऱ्याचे ऑफीसमधील एका तरुणीशी अफेअर आहे असे सांगितल्यावर महिलेने नवऱ्याला सोडायचा प्रस्ताव मांडला . पुढच्या तीन दिवसात वकीलाकडे जाऊन कागदोपत्री व्यवहारही करुन घेतले.
त्यांना दोन मुले आहेत. तसेच नवऱ्याला आधी ती मज्जा करते आहे असे वाटले. मात्र कोर्टाची नोटीस हाताता आल्यावर त्याला खात्री पटली. त्यावेळी त्याची बायको या आधीही अनेकदा अंधश्रद्धेच्या आहारी गेली आहे असे नवऱ्याने सांगितले. चूक मान्य करायला तेव्हाही तिने ३ वर्षे लावली होती मात्र या वेळी परिस्थिती हाताच्या बाहेर गेली असे तिचा नवरा म्हणाला. त्याचे कोणाशीही अनैतिक संबंध नाहीत असेही तो म्हणाला. शिवाय कोर्टात चॅटजीपीटीने कॉफी मग पाहून वर्तवलेले भविष्य पुरावा म्हणून मान्य होणार नाही. असे नवऱ्याच्या वकीलाने सांगितले. त्यामुळे नवरा अपराधी असल्याने सिद्ध करता येत नसल्याने महिलेला कोणतीही रक्कम मिळू नये यासाठीही वकीलाने प्रस्ताव मांडला.
चॅटजीपीटीचा वापर आजकाल सगळीकडेच खुप केला जातो. कॉलेजची मुले तर प्रोजेक्ट करण्याचे कष्ट आता घेत नाहीत. टेक्नोलॉजी मानवाची आकलन शक्ती कमी करत आहे यावर अनेक अभ्यास आपण पाहिले आहेत. मात्र टेक्नोलॉजीमुळे १२ वर्षाचा सुखी संसारही उद्वस्त होऊ शकतो असा प्रकार आता समोर आला आहे.