Deadbody Fat Injections Cosmetic Surgery: आपण अधिक सुंदर किंवा आकर्षक दिसावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. याबाबत महिलांचा अधिक अट्टाहास असतो. सौंदर्य खुलवण्यासाठी महिला किंवा तरूणी अधिक मेहनत घेतात. वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केला जातो, वेगवेगळे व्यायाम केले जातात, योगा केला जातो. सोबतच काही नॅचरल उपायांची मदत घेतली जाते. काही महिला प्लास्टिक सर्जरीचा मार्ग निवडतात. पण सध्या अमेरिकेत सुंदर दिसण्यासाठी महिलांमध्ये एक फारच भयानक कॉस्मेटिक ट्रेंड बघायला मिळत आहे.
या ट्रेंडमध्ये महिलांच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये मृत व्यक्तीच्या शरीरातून काढलेली चरबी इंजेक्ट केली जाते. ही चरबी स्तन, हिप्स आणि बटक्समध्ये टाकली जाते. जेणेकरून शरीराला आवरग्लास शेप मिळावा. या प्रक्रियेला AlloClae असं नाव देण्यात आलं आहे. तर ही प्रक्रिया टायगर अॅस्थेटिक्स नावाची कंपनी प्रमोट करत आहे. हल्लीच न्यूयॉर्कमधील एक ३४ वर्षीय महिलेनं सांगितलं की, तिने हिप्स आणि बॅक साइडचा शेप सुधारण्यासाठी तब्बल ४० लाख रूपये खर्च केले.
कुठून आणतात ही चरबी?
आता आपल्याला प्रश्न पडणं साहजिक आहे की, महिलांच्या सौंदर्यासाठी वापरली जाणारी ही चरबी कुठून आणली जाते? तर ही चरबी अशा लोकांच्या शरीरातून घेतली जाते, ज्यांनी मरणानंतर आपले अवयव आणि टिश्यू सायन्ससाठी दान केले आहेत. हे टिश्यू आधी स्टरलाइज केले जातात, नंतर शुद्ध करून एका खास फॅट मॅट्रिक्समध्ये बदलले जातात. यातून डीएनए आणि जिवंत सेल्स काढले जातात. कंपनीने दावा केलाय की, ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित आहे.
कुणावर केली जाते ही प्रक्रिया?
ही प्रक्रिया सामान्यपणे अशा लोकांसाठी बनवण्यात आली आहे, ज्यांच्या शरीरावर चरबी कमी असते किंवा ज्यांनी आधी लिपोसक्शन केलं आहे. बरेच लोक ज्यांनी ओजेम्पिक आणि मोंजारोसारखी औषधं घेऊन वजन कमी केलंय, त्यांच्या शरीरातही पुरेशी चरबी वाचत नाही. त्यामुळे हे लोक अशाप्रकारच्या इंजेक्शनकडे वळतात. या प्रक्रियेमध्ये जनरल अॅनेस्थेशियाची गरज पडत नाही आणि १ तासात ही प्रक्रिया केली जाते. हे फिलर हिप्स डिप्स भरणे, बटक्सला शेप वाढवणे आणि ब्रेस्टचा आकार वाढवण्यासाठी वापरलं जातं.
किती येतो खर्च?
मृत व्यक्तीच्या चरबीच्या या इंजेक्शनची किंमत १० हजार डॉलरपासून ते १ लाख डॉलरपर्यंत असू शकते. भारतीय करन्सीत ही किंमत साधारण ८ ते ८० लाख रूपयांपर्यंत होते. आपण किती फॅट इंजेक्ट करता त्यावर किंमत अवलंबून असते. हेच कारण आहे की, ही प्रक्रिया फक्त श्रीमंत लोकांमध्येच लोकप्रिय आहे. डॉक्टर सांगतात की, या प्रक्रियेत फॅट नेक्रोसिस, इंजेक्शन आणि फॅट एम्बोलिज्मसारखे गंभीर धोके असतात. त्याशिवाय ब्रेस्टमध्ये जैविक पदार्थ टाकल्याने कॅन्सरची टेस्ट आणि मॅमोग्राफीमध्ये अडचण येऊ शकते.
Web Summary : A cosmetic trend using fat from deceased individuals for body augmentation is gaining popularity, involving risks like fat necrosis and high costs, primarily among the wealthy.
Web Summary : मृत व्यक्तियों से प्राप्त वसा का उपयोग कर शरीर वृद्धि का एक कॉस्मेटिक चलन बढ़ रहा है, जिसमें वसा परिगलन और उच्च लागत जैसे जोखिम शामिल हैं, जो मुख्य रूप से धनी लोगों में है।