टॉयलेट (Toilet) हा घरातला सगळ्यात जास्त वापरला जाणारा भाग आहे. टॉयलेटमध्ये रोज बॅक्टेरिया, दुर्गंध जमा होत राहतो. टॉयलेट सीटची नियमित साफसफाई केली नाही तर ही घाण वाढू शकते. बाजारात मिळणाऱ्या क्लिनर्सचा वापर केल्यास तात्पुरता परीणाम दिसून येतो (Diwali Cleaning Tips). काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही टॉयलेट सीट व्यवस्थित चमकवू शकता. हे सोपे उपाय कोणते समजून घेऊ. (Why Should You Put Salt In Your Toilet Know Easy Bathroom Cleaning Hack)
मिठाचा वापर करा
टॉयलेट सीट क्लिन करण्यासाठी तुम्ही मिठाचा वापर करू शकता. मीठ एक नॅच्युरल क्लिनर आहे. यातील गुण टॉयलेट सीटचे हट्टी डाग सैल करण्यास मदत करतात. याशिवाय टॉयलेटमधून येणारा दुर्गंध कमी होण्यासही मदत होते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही बेकींग सोडा आणि लिंबाचा वापर करू शकता. बेकिंग सोडा डाग स्वच्छ करण्यासाठी एक असरदार उपाय आहे. लिंबू टॉयलेटमध्ये फ्रेशनेस टिकवून ठेवण्यास मदत करतो.
फरशीवर केसांचे पुंजके पडलेले असतात? १ घरगुती उपाय करा, केसगळती थांबेल-भराभर वाढतील
हा उपाय करण्यासाठी गरजेनुसार मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट टॉयलेट सीटवर घालून ब्रशनं हलक्या हातानं रगडून घ्या. रात्रभर असंच ठेवा. दुसऱ्या दिवशी गरम पाणी घालून सीट व्यवस्थित धुवून घ्या (Ref). याचा वापर करून तुम्ही टॉयलेटवर जमा झालेले हट्टी डाग काढून टाकू शकता. हा उपाय पूर्णपणे नॅच्युरल आणि सुरक्षित आहे. यात कोणतेही हानिकारक केमिकल्स वापरले जात नाहीत. तुमच्या घरात लहान मुलं असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे टॉयलेट क्लिन राहण्यास मदत होईल. 2 आठवड्यातून एकदा तु्म्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे टॉयलेट क्लिन दिसेल.
मीठ हे एक नैसर्गिक क्लिनिंग एजंटप्रमाणे काम करते. यात हानिकारक केमिकल्स नसतात. हा सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे. मीठ टॉयलेट सिटीवरील हट्टी डाग काढण्यास मदत करतो. मीठात दु्र्गंधी शोषून घेण्याची क्षमता असते. टॉयलेटमधील दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. मिठात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. ज्यामळे टॉयलेटमधील बॅक्टेरिया आणि बुरशी कमी करण्यास मदत होते.