जेनेलिया डिसुझा म्हणजे बॉलीवूडची एक गोड अभिनेत्री. साऊथमध्ये तिने जेवढं नाव कमावलं आहे, तेवढंच तिला बॉलीवूडमध्येही मानतात आणि आता तर ती महाराष्ट्राचीही लाडकी झाली आहे. आपल्याला माहितीच आहे की ज्याप्रमाणे बॉलीवूडमधले काही स्टार्स वेगन डाएट घेतात, त्याचप्रमाणे मागच्या काही वर्षांपासून जेनेलियानेही वेगन डाएट घ्यायला सुरुवात केली आहे. काही वर्षांपुर्वी अगदी सर्रास मांसाहार घेणारी जेनेलिया आता पूर्णपणे वेगन डाएटवर आली आहे. तिच्यामध्ये हा मोठा बदल घडून आणण्यामागचं कारण म्हणजे तिचा मुलगा.. असं नेमकं काय झालं ज्यामुळे जेनेलियाच्या आहारपद्धतीत मोठा बदल घडून आला? (main reason why genelia d'souza gives up non veg)
कधी कधी आपल्यालाही असा अनुभव येतो की निरागस लहान मुलं मध्येच अशा काही गोष्टी बोलून जातात ज्यामुळे आपण खूप विचारात पडतो. कधी कधी तो प्रश्न त्यांच्या कुतूहलातून आलेला असतो तर कधी कधी त्यांच्या बालबुद्धीला एखादी गोष्ट पटत नाही, म्हणून तो प्रश्न विचारला जातो.
ताकातला पालक म्हणजे अस्सल पारंपरिक चव, करा ताकातली पालकाची भाजी-नेहमीपेक्षा जास्त खमंग आणि पौष्टिक
पण तो प्रश्न मोठ्या मंडळींना मात्र अंर्तमुख करणारा ठरू शकतो. जेनेलियाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. तिच्या चिमुकल्या मुलाने तिला थेटच विचारलं की तुला तर प्राणी एवढे आवडतात, मग तरीही तू त्यांना कसं काय खाऊ शकतेस? तिच्या मुलाचा हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे.
मनात आलं ते किती सहज तो बोलून गेला, पण त्याचा मात्र जेनेलियाच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. एकीकडे प्राण्यांवर प्रेम करणं आणि दुसरीकडे मांसाहार घेणं हा खरोखरच मोठा विरोधाभास आहे.
गुलाबाच्या रोपावर बारीक किडे, मुंग्या दिसतात? पानांनाही छिद्रं पडली? ४ उपाय- रोप पुन्हा जोमात वाढेल
त्या लहान मुलाला तो बरोबर जाणवला आणि त्यातून त्याच्या आईचा आहारच पूर्णपणे बदलून गेला. त्यानंतर जेनेलिया शाकाहारी झाली आणि आता तर मागच्या काही वर्षांपासून ती वेगन झाली आहे. आता तर वेगन डाएट तिला एवढं परफेक्ट वाटतं की ते सुरू केल्यापासून तब्येतीच्याही कित्येक तक्रारी दूर झाल्याचं ती नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगत असते.
