Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?

Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?

Mutual Funds investment: Mutual Feelings vs Mutual Funds: Gen Z investment advice: अर्थमंत्र्यांच्या एक काल्पनिक सल्ला सोशल मीडियात व्हायरल आहे, पण तरुणांना तो पटेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 12:58 IST2026-02-05T12:57:51+5:302026-02-05T12:58:54+5:30

Mutual Funds investment: Mutual Feelings vs Mutual Funds: Gen Z investment advice: अर्थमंत्र्यांच्या एक काल्पनिक सल्ला सोशल मीडियात व्हायरल आहे, पण तरुणांना तो पटेल का?

why Gen Z should invest in mutual funds early mutual funds investment tips for beginners financial advice for Gen Z finance minster advises youth to invest mutual funds instead of mutual feelings on this valentine | Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?

Mutual Feelings नंतर, आधी Mutual Funds मध्ये इन्व्हेस्ट करा! जेन झी ‘हा’ व्हायरल सल्ला ऐकेल?

प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं पण व्यावहारिक जगात मात्र प्रेमालाही अस्तित्वाच्या भक्कम पायाची गरज असते. लग्न ठरवताना किंवा प्रेमात पडल्यानंतर सुरुवातीचे गुलाबी दिवस सरले की अनेकांना वास्तवाचे चटके सोसावे लागतात. (Mutual Funds investment) आजही आपल्या समाजात मुलगा कितीही हुशार, देखणा किंवा सुशिक्षित असला तरी पहिला विचारला जाणारा प्रश्न हाच मुलगा कमावतो किती?, मुंबईत स्वत:चं घर आहे का? शेतजमीन नाही निदान चारचाकी गाडी आहे का? पैशांचा काही बॅकअप आहे का? अशा नाना तऱ्हेची प्रश्न कायमच डोळ्यांसमोर घिरट्या घालत असतात. (Mutual Feelings vs Mutual Funds)

कपभर पोह्यांचा कुरकुरीत वडा आणि आंबट-गोड कैरीची चटणी! खमंग वड्यांची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट बेत

मनात एकीकडे Mutual Feelings चा वर्षाव होत असतो तर दुसरीकडे आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक नियोजनांचे ओझे समोर दिसू लागते. प्रेमात पडल्यानंतर आपण भविष्याची स्वप्न रंगवतो. महागडे गिफ्ट्स, फिरणं आणि पार्ट्यांवर होणारा खर्च डोळ्यांसमोर येतो. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तरुणाईला मोलाचा आणि तितकाच मिश्किल असा सल्ला दिला. केवळ Mutual Feelings मध्ये वेळ आणि पैसा न घालवता, भविष्यासाठी Mutual Funds मध्ये गुंतवणूक करा. त्यांच्या हा सल्ला गंमतीचा भाग म्हणून सोडल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराला सुखी आयुष्य द्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक 'वेक-अप कॉल' आहे. कारण घर हे प्रेमावर चालत नाही तर चांगल्या आर्थिक नियोजनावर चालते. 

जेव्हा एखादा तरुण प्रेमात पडतो, तेव्हा त्याला जग गुलाबी दिसायला लागतं. रात्री २-२ वाजेपर्यंत चालणारे चॅटिंग, एकमेकांसाठी पाहिलेली स्वप्नं आणि तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून आणेन अशी दिलेली वचनं... हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा त्याच नात्यात 'ब्रेकअप' नावाचा भूकंप येतो, तेव्हा मात्र समोर उरतो तो फक्त अंधार. यावर, अर्थमंत्र्यांच्या एका काल्पनिक पण 'सॅव्हेज' भाषणाने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. 
त्यांनी तरुणाईला असा आर्थिक आरसा दाखवला आहे, जो आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो आहे. 

त्या म्हणतात ज्या मालमत्तेत आपल्याला लिक्विडिटी नाही, तिथे आपली भावनिक गुंतवणूक करणं वेळीच बंद करा. त्यांनी अशा प्रेमाला नॉन-परफॉर्मिंग ॲसेट' (NPA) म्हणजेच बुडीत कर्ज असं म्हटलं. यावर त्या असं ही म्हटल्या की शेअर बाजार कोसळला तर तो पुन्हा सावरण्याची संधी आपल्याकडे असते. पण रात्री २ वाजता ब्रेकअप झाल्यानंतर आपलं हृदय तुटत तेव्हा आपला तोटा होतो. त्यावर आपल्याला कोणतेही टॅक्स बेनिफिट मिळत नाही. 

सध्याच्या Gen Z पिढीला सल्ला देताना त्या म्हणतात की कुणाला तरी I Love You म्हणण्यापेक्षा I SIP You म्हणायला शिका. म्युच्युअल फंडाच्या बाबतीत जोखीम ही 'बाजाराच्या अधीन' असते, पण प्रेमाच्या बाबतीत ती जोखीम 'जोडीदाराच्या मूड स्विंग्स'च्या अधीन असते. बाजाराचा मूड समजून घेणं कदाचित सोपं असेल, पण पार्टनरचा मूड समजून घेताना मात्र चांगल्या-चांगल्यांचे बजेट कोलमडतात.

आपल्या एक्सने दिलेल्या पोकळ आश्वासनांपेक्षा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आपल्याला भविष्यात चांगला रिटर्न देईल. प्रेम करा, भावना जपून ठेवा, पण आपल्या खिशाचं नियोजन आधी करा. कारण शेवटी, तुटलेल्या हृदयाला मलम लावण्यासाठीही पैशांची गरज लागतेच.
 

Web Title : जेन ज़ी को वित्त मंत्री की सलाह: भावनाओं से ज़्यादा म्यूचुअल फंड में निवेश करें।

Web Summary : प्यार से परे, वित्तीय योजना महत्वपूर्ण है। वित्त मंत्री जेन ज़ी को सुरक्षित भविष्य के लिए भावनाओं के बजाय म्यूचुअल फंड में निवेश करने की सलाह देती हैं। स्थायी खुशी के लिए वित्तीय स्थिरता को प्राथमिकता दें।

Web Title : Invest in mutual funds, not just feelings, advises FM to Gen Z.

Web Summary : Beyond romance, financial planning is key. FM advises Gen Z to invest in mutual funds, not just emotions, for a secure future. Prioritize financial stability for lasting happiness.