Dual Flush Toilet Benefits: वेस्टर्न टॉयलेट आजकालच्या घरांमध्ये जास्तीत जास्त वापरले जातात. शहरासोबतच ग्रामीण भागातही लोक यांचा वापर करू लागले आहेत. पण शहरांमध्ये याचं प्रमाण अधिक बघायला मिळतं. आपण पाहिल की, टॉयलेट सीटच्या मागे पाण्यासाठी एक फ्लश टॅंक दिलेली असते. त्यावरील बटन दाबून टॉयलेटनंतर पाणी सोडलं जातं. तुम्हीही कधीना कधी फ्लशचा वापर केला असेलच. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का की, फ्लश टॅंकवर दोन प्रकारचे बटन असतात. एक छोटं असतं आणि दुसरं थोडं मोठं असतं. पण हे दोन बटन देण्याचं कारण काय असतं? हे अनेकांना माहितीच नसतं. चला तर मग तेच आज जाणून घेऊ.
अमेरिकेतील डिझायनर व्हिक्टर पापानेकनं टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असलेलं फ्लश देण्याची आयडिया दिली होती. सुरूवातीला यावर छोट्या प्रमाणात टेस्ट केली गेली होती. ही टेस्ट यशस्वी झाल्यावर याचा वापर जगभरात होऊ लागला.
काय आहे कारण!
जगभरात सध्या पाण्याची समस्या समस्या भीषण झाली आहे. पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जात आहेत. वेस्टर्न टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असणाऱ्या फ्लशचा वापर पाणी वाचवण्यासाठी केला जातो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये मोठं बटन सॉलिड वेस्ट रिमुव्हलसाठी असतं, जे दाबल्यावर ६ लिटर ते ९ लिटर पाणी वाहतं. तर छोटं बटन दाबल्यावर वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे ३ ते ४ लिटर असतं.
वेगवेगळा आहे दोन्ही बटनांचा वापर
नक्कीच आम्हाला आशा आहे की, फ्लशमधील दोन बटनांचा उद्देश माहीत झाल्यावर आता तुम्ही वेस्टर्न टॉयलेटचा योग्य वापर कराल. म्हणजे तुम्ही केवळ लघवीला गेले असाल तर छोटं बटन दाबून पाणी सोडू शकता, तर शौचास गेले असाल तर मोठं बटन दाबून पाणी सोडू शकता. अनेकदा लोक एकत्रच दोन्ही बटन दाबतात. जेणेकरून जास्त पाणी निघावं. पण असं नसतं. दोन्ही बटन एकत्र दाबले तर ते खराब होऊ शकतात. त्यामुळे गरजेनुसार त्यांचा वापर करावा.
या बटनांचा योग्य वापर न केल्यास कितीतरी लिटर पाणी वाया जातं. रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, सिंगल बटनाऐवजी दोन बटन असलेल्या फ्लश सिस्टीमनं घरांमध्ये वर्षभरात २० हजार लीटर पाणी वाचवलं जाऊ शकतं. सध्या आपल्याला पाणी वाचवण्याची आणि ते पुढील पीढीला देण्याची गरज आहे. पण आपण नकळत हजारो लीटर पाणी वाया घालवत आहोत. वेस्टर्न कमोडमध्ये २ बटनांची सिस्टीम १९७६ मध्ये सुरू करण्यात आली आणि याचा वापर सगळ्यात आधी १९८० मध्ये ऑस्ट्रेलियात करण्यात आला.
