Washing Machine Facts : रोज आपण कितीतरी वस्तूंचा वापर करतो, पण याच रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत लोकांना पूर्ण माहिती नसते. बऱ्याच वस्तूंवर अशा कितीतरी गोष्टी असतात, ज्या डिझाइन समजल्या जातात. त्यामुळे त्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीकडून किंवा सोशल मीडियावर या गोष्टी माहिती मिळते तेव्हा अचंबित व्हायला होतं. 'हे तर आपल्याला माहितीच नव्हतं' अशी त्यांची स्थिती होते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती वॉशिंग मशीनबाबत असं काही सांगतोय, जे जास्ती जास्त लोकांना माहीत नसतं.
वॉशिंग मशीनच्या वरच्या भागात लाइन्स का असतात?
आता जो व्हिडीओ व्हायरल झालाय, त्यात व्यक्तीने वॉशिंग मशीनबाबत असं काही सांगितलंय, जे क्वचितच कुणाला माहीत असेल. व्हायरल व्हिडिओत आपण बघू शकता की, एक व्यक्ती सेमी - ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन दाखवत आहे. त्यानंतर तो त्यावरील लाइन्स दाखवतो. तो लोकांना विचारतो की, या लाइन्स कशासाठी असतात? त्यानंतर तो स्वत:च सांगतो की, अनेकदा कपडे जास्त मळतात जसे की, शर्टची कॉलर किंवा हातांचे कप. वॉशिंग मशीनमध्ये कॉलर किंवा कपवरील मळ पूर्णपणे निघत नाही. अशात या लाइन्सवर कॉलर - कप घासू शकता. ज्यामुळे मैल सैल होतो आणि मग कपडे चांगले स्वच्छ होतात.
वॉशिंग मशीनसंबंधी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर jaiswalelectronics_ नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय आणि आतापर्यंत हा व्हिडीओ २६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलाय. कारण ही माहिती त्यांना महत्वाची आणि कामाची वाटली. बऱ्याच लोकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका महिलेने लिहिलं की, 'उद्यापासून करेल, आजपर्यंत माहीत नव्हतं'. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, '८ वर्ष झालीत मशीन वापरत आहे, आज हे समजलं'. एका यूजरने लिहिलं की, 'हीच मशीन मी ११ वर्षांपासून वापरत आहे, आज ही गोष्ट समजली'.
