Join us
Daily Top 2Weekly Top 5

who is this uncle? असं ‘ती’ शाहरुख खानला खरंच म्हणाली, कोण ती? का तिच्यावर चिडले लोक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 16:35 IST

Who is this uncle? Did 'she' really say that to Shahrukh Khan, who is she? Why are people angry with her? : हांडे एर्सेल शाहरुखबद्दल असे काय बोल्ली की सगळेच झाले नाराज.

बॉलिवूडचा किंग मानला जाणारा अभिनेता शाहरुख खान भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. बाहेर देशातील कार्यक्रमांमध्येही शाहरुखला बोलवले जाते. रेड कार्पेट असो किंवा मग एखादे अॅवॉर्ड फंक्शन विविध ठिकाणी शाहरुख स्पॉटलाईटमध्ये असतो. सध्या किंग खानचे फॅन सोशल मिडियावर जबरदस्त निगेटीव्ह पोस्टवर पोस्ट करताना दिसत आहेत, ते ही एका तुर्की अभिनेत्रीविरुद्ध. (Who is this uncle? Did 'she' really say that to Shahrukh Khan, who is she? Why are people angry with her?)नक्की भानगड काय? झाले असे की अवॉर्ड्स हा सौदी अरेबियातील एक प्रसिद्ध असा कार्यक्रम असून २०२६ मधील कार्यक्रम होस्ट करण्यासाठी शाहरुख खानला आमंत्रित केले. त्याची विशेष उपस्थिती चार चाँद लावेल यात काही शंकाच नव्हती. मात्र कार्यक्रमानंतर सोशल मिडायात चर्चा झाली ती भलतीच. 

हांडे एर्सेल ही तुर्कीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जगभरात तिचे फॅन्स आहेत. भारतातही ती लोकप्रिय आहे. सौदीतील कार्यक्रमात तिचीही उपस्थिती होती. शाहरुख खान होस्ट करत असताना हांडे त्याचे फोटो काढत असल्याची बातमी सोशल मिडियावर पोस्ट झाली आणि मग वाऱ्याच्या वेगाने व्हायरलही झाली. शाहरुखच्या फॅन्सनी हांडे च्या इस्टाग्राम पोस्टवर शाहरुखला टॅन करुन फॅन गर्ल , किंगच्या मागे वेडी वगैरे कमेंट्स करुन तिला हैराण करुन सोडले. त्यावर तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अचानक तिच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली ज्यात हांडे तिच्या मैत्रिणीचा फोटो काढत होती आणि शाहरुख खान फ्रेममध्ये फक्त दिसल्याचे त्या पोस्टमधून स्पष्ट झाले. मात्र नंतर आणखी एक पोस्ट दिसली ज्यात हांडे ने Who is this uncle? i am not his fan girl असे लिहिले होते आणि ती पोस्ट पाहून लोकांनी हांडे बद्दल प्रचंड वाईटसाईट बोलायला सुरवात केली. तिच्याबद्दल मिम्स तयार करण्यात आले आणि सोशल मिडियात तिला भरपूर नेगेटीव्हीटी सहन करावी लागली. 

शेवटी वैतागून हांडे ने ती पोस्ट फेक असल्याचे ट्विटरवर सांगितले. तिने शाहरुख खानबद्दल काहीही पोस्ट केले नाही कार्यक्रमात ती तिच्या मैत्रिणीचा फोटो काढत असल्याचे तिने सांगितले. हांडे च्या फॅन पेजेसवरुन AI चा वापर करुन केलेली ती पोस्ट असल्याचे स्पष्ट केले. इतर काहीही वक्तव्य ना हांडे ने केले ना शाहरुखने. सोशल मिडियात लोकांनी या विषयाला उगाचच हवा दिली हे तर स्पष्टच आहे. आता शाहरुखचे फॅन्स हांडेची माफी मागत आसल्याच्या पोस्ट दिसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Turkish actress's alleged comment on Shah Rukh Khan sparks online outrage.

Web Summary : A fake post attributed to Turkish actress Hande Erçel, allegedly insulting Shah Rukh Khan, went viral. Fans reacted negatively until Erçel clarified it was fabricated. The controversy stemmed from an awards show in Saudi Arabia where both were present. Now, fans are apologizing.
टॅग्स :शाहरुख खानसोशल मीडियासोशल व्हायरलट्रोल