Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला? छोट्याशा पिनने जगभर महिलांचं जगणंच बदललं, पण ही आयडिया आली कुठून..

सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला? छोट्याशा पिनने जगभर महिलांचं जगणंच बदललं, पण ही आयडिया आली कुठून..

Safety Pin Hidden Engineering: महिलांच्या बॅगमध्ये सुद्धा सेफ्टी पिन असतेच असते. पण या इतक्या कामाच्या सेफ्टी पिनचा आविष्कार कधी करण्यात आला, कुणी केला हे कुणालाच माहीत नसतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:15 IST2026-01-20T15:20:26+5:302026-01-20T16:15:00+5:30

Safety Pin Hidden Engineering: महिलांच्या बॅगमध्ये सुद्धा सेफ्टी पिन असतेच असते. पण या इतक्या कामाच्या सेफ्टी पिनचा आविष्कार कधी करण्यात आला, कुणी केला हे कुणालाच माहीत नसतं.

Who discover safety pin and when, know the safety pin interesting history | सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला? छोट्याशा पिनने जगभर महिलांचं जगणंच बदललं, पण ही आयडिया आली कुठून..

सेफ्टी पिनचा शोध कुणी लावला? छोट्याशा पिनने जगभर महिलांचं जगणंच बदललं, पण ही आयडिया आली कुठून..

Safety Pin Hidden Engineering: सेफ्टी पिनचं काय महत्व असतं हे महिलांपेक्षा जास्त चांगलं कुणालाही कळणार नाही. कपडे जोडण्यापासून ते पेटिकोटमध्ये नाळा टाकेपर्यंत अनेक छोटी छोटी कामे करण्यासाठी या पिनचा वापर घराघरांमध्ये सर्रासपणे केला जातो. महिलांच्या बॅगमध्ये सुद्धा सेफ्टी पिन असतेच असते. पण या इतक्या कामाच्या सेफ्टी पिनचा आविष्कार कधी करण्यात आला, कुणी केला हे कुणालाच माहीत नसतं. इतकंच नाही तर या पिनमधील छोटं छिद्र कशासाठी हेही अनेकांना माहीत नसतं. बरेच लोक कानातील मळ काढण्यासाठी या छिद्राचा वापर करतात. पण हे छिद्र डिझाइनचा भाग नसून स्मार्ट इंजिनिअरींग आहे. चला तर जाणून घेऊन सेफ्टी पिनचा इतिहास आणि त्यातील छिद्राचं महत्व.

सेफ्टी पिनचा इतिहास

सेफ्टी पिनचा इतिहास हा फार जुना आहे. प्राचीन काळात याला लॅटिन भाषेत ‘फिबुला’ म्हटलं जातं. असं मानलं जातं की, याचा वापर कांस्य युगात यूरोपमधून सुरू झाला होता. त्यावेळी ही पिन कपडे जोडणे आणि शरीरावर कपडे टिकून राहण्यासाठी केला जात होता. आज आपण जी सेफ्टी पिन वापरतो, त्याचं आधुनिक रूप हे १८४९ मध्ये वॉल्टर हंटने तयार केलेलं आहे.

कसं बदललं रूप?

१८४९ मध्ये वॉल्टर हंटने एकाच तारेला फोल्ड करून स्प्रिंगचे मेकॅनिझम तयार केलं. ही आधुनिक सेफ्टी पिनची खरी ओळख आहे. याआधी पिन बनवण्याच्या दोन पद्धती प्रचलित होत्या. उत्तर यूरोपमध्ये वापरली जाणारी पिन दोन भागात बनवली जात होती आणि त्यात स्प्रिंग नव्हता. एका पिनमध्ये छिद्र असायचं आणि दुसऱ्या पिनमध्ये ते फसवून क्लॅपने बंद केलं जात होतं. हे फारच अवघड असं डिझाइन होतं.

मध्य यूरोप, ग्रीस आणि इटलीमध्ये वापरली जाणारी सेफ्टी पिन बरीचशी आजच्या सेफ्टी पिनसोबत मिळती-जुळती होती. ही एकाच तारेने बनवली जात होती आणि मधे स्प्रिंग असायचा. तारेचं एक टोक टोकदार असायचं आणि दुसरं टोक वाकवलेलं. ज्याच्या मदतीने पिन लॉक करता येत होती. हेच डिझाइन पुढे जाऊन सेफ्टी पिन बनलं.

सेफ्टी पिनमधील छिद्राचं काम काय?

जर सेफ्टी पिन बारकाईने पाहिली तर लक्षात येईल की, तिचा खालच्या भागात ताराला गोल करून एक कॉइल बनवली जाते. हाच भाग स्प्रिंगचं काम करतो. या स्प्रिंगमध्ये असलेलं छिद्र ताराला योग्य अॅंगल आणि तणाव देण्यास मदत करतं. हा तणावच टोकदार टोकाला मजबुतीने लॉक करून ठेवतो. तेच जर सेफ्टी पिनमध्ये स्प्रिंग आणि हे छोटं छिद्र नसेल तर पिन पुन्हा पुन्हा उघडत राहणार. अशात कपडेही निट राहणार नाही आणि पिन रूतण्याचीही भीती राहते.

सेफ्टी पिन दिसायला भलेही छोटी आणि सामान्य वाटत असली तरी याचं डिझाइन अनेक दशकांची समज आणि प्रयोगाचं रूप आहे. एक छोटसं छिद्र, एक स्प्रिंग आणि एक तार मिळून एक असं टूल बनवलं जातं, ज्याचा वापर आजही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता पुढच्यावेळी जेव्हा सेफ्टी पिन हाती घ्याल तेव्हा निट बघा आणि लक्षात ठेवा की, हा केवळ एक तार नाही तर एक इंजिनिअरींगची एक कमाल आहे.

Web Title : सेफ्टी पिन का आविष्कारक: एक छोटी पिन, महिलाओं के जीवन में क्रांति।

Web Summary : वॉल्टर हंट द्वारा 1849 में आविष्कार की गई सेफ्टी पिन, प्राचीन 'फिबुला' से विकसित हुई। इसकी स्प्रिंग और छोटा छेद तनाव प्रदान करते हैं, इसे सुरक्षित रूप से लॉक करते हैं। यह सरल इंजीनियरिंग चमत्कार है, जिसने महिलाओं के जीवन को बदल दिया।

Web Title : Safety pin's inventor: A small pin revolutionized women's lives globally.

Web Summary : The safety pin, invented by Walter Hunt in 1849, evolved from ancient 'fibulae.' Its spring and small hole provide tension, securely locking it. This simple engineering marvel, often overlooked, has transformed daily life for women worldwide.