पांढरी फरशी घराला स्वच्छ, प्रशस्त आणि उजळ लूक देते. मात्र तिची निगा नीट राखली नाही तर धूळ, पायांचे ठसे, पाण्याचे डाग आणि मळ पटकन दिसू लागतो. घरात लहान मुले असतील तर मग बघायलाच नको. पांढरी फर्शी कधी, लाल - पिवळी होते कळतच नाही. पण काही गोष्टींची काळजी घेऊन ही फर्शी वर्षानुवर्षे नव्यासारखी ठेवता येते. (White floor looks stained? A very simple cleaning method)त्यामुळे पांढरी फरशी नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी नियमित काळजी घेणे फार गरजेचे असते.
पांढरी फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात आधी रोजची सवय महत्त्वाची ठरते. दररोज कोरडी झाडू मारण्याऐवजी ओल्या कपड्याने किंवा मॉपने फरशी पुसणे जास्त उपयुक्त ठरते. ओल्या पुसण्यामुळे धूळ उडत नाही आणि फरशीवर चिकटलेला मळ सहज निघून जातो. आधी झाडणे आणि नंतर पुसणे ही प्रक्रिया असावी. पाण्यात थोडे सौम्य फ्लोअर क्लिनर किंवा साबण घालून पुसल्यास फरशी स्वच्छ राहते, मात्र खूप जास्त रसायने वापरणे टाळावे. त्याचे डाग फरशीवर राहतात.
आठवड्यातून एकदा सखोल स्वच्छता करणे पांढऱ्या फरशीसाठी आवश्यक आहे. कोमट पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून फरशी पुसल्यास पाण्याचे डाग आणि हलकी चिकट घाण निघून जाते. जिथे जास्त मळ साचतो, जसे की स्वयंपाकघर किंवा प्रवेशद्वार, तिथे थोडा वेळ द्रावण ठेवून मग मॉपने पुसावे. यामुळे फरशीचा रंग स्वच्छ आणि तजेलदार दिसतो.
पांढर्या फरशीवर पायांचे ठसे पटकन दिसतात, म्हणून घरात येताना पाय पुसण्यासाठी दारात फडके ठेवणे फार महत्त्वाचे आहे. बाहेरुन येताना चपला-बूट काढून आत जाण्याची सवय केल्यास माती आणि घाण आत येत नाही. लहान मुले असतील तर त्यांनी खेळून आल्यानंतर पाय धुवून घरात यावेत याकडे लक्ष द्यावे.
काही वेळा पांढऱ्या फरशीवर हट्टी डाग पडतात. चहा-कॉफी, हळद, तेल किंवा पाण्याचे जुने डाग अशा वेळी लगेच स्वच्छ करणे गरजेचे असते. थोडा बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करून त्या डागावर लावून हलक्या हाताने घासल्यास डाग कमी होतात. मात्र फार कडक ब्रश वापरू नये, कारण त्यामुळे फरशीवर ओरखडे पडू शकतात.
पांढरी फरशी जास्त काळ स्वच्छ राहावी यासाठी ओलसरपणा टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फरशी पुसल्यानंतर ती नीट कोरडी होऊ द्यावी. पाणी साचून राहिल्यास डाग पडण्याची शक्यता वाढते. बाथरूमजवळील किंवा स्वयंपाकघरातील फरशी जास्त वेळ ओलसर राहणार नाही याची काळजी घ्यावी.
घरातील पांढरी फरशी दीर्घकाळ तशीच टिकून राहावी आणि तिचा रंग बदलू नये यासाठी खूप तीव्र अॅसिड किंवा कडक केमिकल क्लिनर वापरणे टाळावे. नैसर्गिक आणि सौम्य स्वच्छता उपाय नियमित वापरल्यास फरशीचा नैसर्गिक रंग आणि चमक टिकून राहते. तसेच केमिकलमुळे त्रास होण्याची शक्यताही असते.
Web Summary : Maintain white floors with daily sweeping, weekly deep cleans using vinegar or lemon, and immediate stain removal. Use baking soda paste for stubborn marks and avoid harsh chemicals. Keep floors dry and place mats at entrances to prevent dirt. Regular care preserves the bright, clean look.
Web Summary : सफेद फर्श को रोज झाड़ू और हफ्ते में सिरका या नींबू से साफ करें। दाग तुरंत हटाएं, बेकिंग सोडा पेस्ट इस्तेमाल करें, कठोर रसायन न प्रयोग करें। फर्श सूखा रखें, प्रवेश द्वार पर पायदान रखें। नियमित देखभाल से चमक बनी रहती है।