Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मॅच गेली उडत, ती बसली वाचत! लहानशा मुलीचा व्हिडिओ व्हायरल-मिमचा पाऊस-असं तिनं काय केलं?

मॅच गेली उडत, ती बसली वाचत! लहानशा मुलीचा व्हिडिओ व्हायरल-मिमचा पाऊस-असं तिनं काय केलं?

While the Crowd Watched the Match, She Kept Reading! Little Girl’s Viral Moment Triggers Meme Storm – What Happened? : चालू सामन्यात पुस्तक वाचणारी मुलगी व्हायरल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 18:39 IST2026-02-27T18:38:00+5:302026-02-27T18:39:28+5:30

While the Crowd Watched the Match, She Kept Reading! Little Girl’s Viral Moment Triggers Meme Storm – What Happened? : चालू सामन्यात पुस्तक वाचणारी मुलगी व्हायरल.

While the Crowd Watched the Match, She Kept Reading! Little Girl’s Viral Moment Triggers Meme Storm – What Happened? | मॅच गेली उडत, ती बसली वाचत! लहानशा मुलीचा व्हिडिओ व्हायरल-मिमचा पाऊस-असं तिनं काय केलं?

मॅच गेली उडत, ती बसली वाचत! लहानशा मुलीचा व्हिडिओ व्हायरल-मिमचा पाऊस-असं तिनं काय केलं?

तिचा फोटो व्हायरल झाला आणि घरोघर म्हणे पालकांनी मुलांना धारेवर धरलं. म्हणे बघ, ऐन परीक्षा काळात तुला मॅच पहायची आणि ती पोर स्टेडियममध्ये वाचत बसली आहे. मनात आणलं ना तर आपण कुठंही वाचू शकतो, अभ्यास करु शकतो. तसे मिम तर इतके व्हायरल झाले की मॅचपेक्षा तिचीच चर्चा जास्त. (While the Crowd Watched the Match, She Kept Reading! Little Girl’s Viral Moment Triggers Meme Storm – What Happened?)ती मुलगी कोण, नाव गाव तर काही कळलं नाही पण तिचा फोटो आणि मिम मात्र व्हायरल झाले त्याची ही गोष्ट.

क्रिकेटचा सामना म्हणजे हृदयाचे ठोके वरखाली करणारा खेळ आहे. एका सेकंदात खेळी पलटू शकते होत्याचं नव्हतं होऊ शकतं. सामना संपेपर्यंत एकाच जागेवर स्तब्ध बसणारे लोकही आहेत.  सामना चालू असताना कॅमेरामन जेव्हा चाहत्यांचे चेहरे दाखतो तेव्हा चेहऱ्यावर चिंता आनंद उत्साह अगदी स्पष्ट दिसतो. त्यात सामना जर टी20चा असेल तर प्रेक्षक एकही चेंडू चुकवत नाहीत. मात्र यावेळी कॅमेरामॅनने भलतेच काही कॅच केले. एक लहान मुलगी चालू सामन्यात मग्न होऊन पुस्तक वाचताना दिसली आणि तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला. विविध पेजवर तिचे मिम्सही पोस्ट झाले. 

कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियम मध्ये जोरदार सामना रंगला होता. सामना न्यूझिलंड आणि श्रीलंकामध्ये सुरु होता. दोन्ही जोरदार खेळणारे संघ त्यात ग्नेन फिलिप्स आणि रचिन रविंद्रची खेळी सुरु होती. स्टेडियममध्ये जोरदार आरडाओरडा सुरु होता. मात्र ही लहान मुलगी कानात हेडफोन्स घालून गोष्टीचं पुस्तक वाचत बसली होती. त्यावर वाचणारे कुठेही वाचतात, अभ्यासू मुलांची गोष्टच वेगळी असते अशा विविध प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत. 

जगात काय चाललं आहे यापेक्षा आपल्याला काय आवडतं ते करावं असा संदेश ही मुलगी देत आहे असेही अनेकांनी म्हटले. पालक सामना पाहायला घेऊन आले म्हणून तोंड पाडून बसण्यापेक्षा तिने तिला जे आवडते ते केले याचं नेटकऱ्यांना फार कौतुक वाटलं. अर्थात एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्याचे मिम तर आता लगेच तयार होतात. या मुलीचेही अनेक मिम सोशल मिडियावर व्हारल झाले. एवढा वर्ल्डकपचा सामना सोडून पोरगी डिझनी सिरिज वाचत बसलेलं पाहून कॅमेरामॅननेही तिला सतत स्क्रिनवर दाखवलं. मात्र तिला त्याचा काही फरकच पडला नाही. ती स्वत:तच मग्न राहीली.

Web Title : क्रिकेट मैच में लड़की ने पढ़ी किताब, वायरल, मीम्स की बाढ़।

Web Summary : क्रिकेट मैच के दौरान एक लड़की किताब पढ़ते हुए वायरल हो गई। खेल को अनदेखा करते हुए, वह अपनी किताब में मग्न हो गई, जिससे मीम्स और अपने आस-पास की परवाह किए बिना अपनी रुचियों को आगे बढ़ाने के बारे में चर्चा हुई। लड़की का ध्यान देखकर दर्शक हैरान रह गए।

Web Title : Girl reads during cricket match, goes viral, memes flood social media.

Web Summary : A young girl reading a book at a cricket match went viral. Ignoring the game, she immersed herself in her book, inspiring memes and discussions about pursuing one's interests regardless of surroundings. The girl's focus amazed viewers.