Join us

जाळी असलेला की नसलेला कोणता फ्रीज चांगला? खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा , वीज बिल येईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 12:01 IST

Best fridge for home use: Fridge buying guide: Cooling coil vs no coil fridge: आपल्या घरासाठी कोणता फ्रीज खरेदी करणे चांगले आहे, जाणून घेऊया.

फ्रीज खरेदी करताना आपला अनेकदा गोंधळ उडतो. एखादी वस्तू खरेदी करताना आपण त्याबाबतीत काही तांत्रिक गोष्टींबाबत माहिती असतेच असे नाही.(Best fridge for home use) हल्ली बाजारात नवनवीन प्रकारचे फ्रीज आले आहेत ज्यामुळे आपल्याला त्यात भाज्या, फळांपासून इतर अनेक गोष्टी साठवता येतात. (Fridge buying guide)आपण फ्रीज किती लिटरचा घ्यायचा याकडे लक्ष देतो परंतु, त्याच्या मागे जाळी आहे की नाही हे तपासत नाही.(Cooling coil vs no coil fridge) गरज नसताना आपण मोठा फ्रीज घेतो आणि वीज बिल जास्त प्रमाणात येऊ लागते.(Energy efficient fridge for home) काही फ्रीजच्या मागे जाळी असते तर काहींच्या मागे जाळी नसते. कोणता फ्रीज खरेदी करणे चांगले आहे, जाणून घेऊया. (Best budget refrigerator in India)

सोशल मीडियाचा ट्रेंड पडला भारी! 'डस्टिंग चॅलेज' पूर्ण करण्याच्या नादात गमावला जीव, काय आहे हा ट्रेंड?

जाळी असलेला फ्रीज 

ज्या फ्रीजच्या मागे काळी जाळी किंवा कूलिंग कॉइल असते जे डायरेक्ट कूल तंत्रज्ञानावर काम करते. या प्रकारच्या फ्रिजमध्ये थंड हवा खूप वेळ टिकून राहते. मागच्या बाजूला कॉइल असतात जे फ्रीजला थंड करतात.  ज्या फ्रीजच्या मागे जाळी नसते तो फ्रॉस्ट फ्री असतो. यामध्ये थंड हवा पंख्याद्वारे फ्रीजच्या आत पसरवली जाते. अशा फ्रिजमध्ये बर्फ जास्त प्रमाणात जमा होत नाही. जाळी असलेल्या फ्रिजमध्ये बर्फ मॅन्युअली पद्धतीने काढावा लागतो. तर फ्रॉस्ट फ्रीमध्ये विशिष्ट पद्धतीने वितळला जातो. जाळी असलेला फ्रीज साध्या तंत्रज्ञानावर काम करतो तर जाळी नसलेला फ्रीज अधिक स्मार्ट पद्धतीने काम करतो. 

विजेचा वापर 

जाळी असलेल्या फ्रिजमध्ये वीज बिल कमी प्रमाणात येते. त्यात पंखा किंवा स्वयंचलित डीफ्रॉस्टिंग सिस्टम नसते. असा फ्रीज छोट्या कुटुंबासाठी चांगला आहे. जाळी नसलेल्या फ्रिजमध्ये कूलिंग फॅन, हीटर, सेन्सर असते. ज्यामुळे वीज बिल जास्त प्रमाणात येते. पण यामध्ये अतिरिक्त जमा झालेला बर्फ सहज निघतो, तसेच अन्नपदार्थ देखील जास्त वेळ राहते. 

स्वच्छता 

जाळी असणाऱ्या फ्रीजमध्ये बर्फ सारखा जमा होतो. त्यामुळे मॅन्युअली डीफ्रॉस्ट करावं लागते. याचा अर्थ असा की जाळीदार फ्रिजमध्ये आपल्याला तो बंद करुन त्याचा बर्फ वितळवावा लागतो. तसेच मागच्या बाजूला असलेल्या कॉइलवर धूळ आणि घाम जमा होते, जी आपल्याला साफ करावी लागते. कॉइल असणाऱ्या फ्रीजमध्ये अशा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. या प्रकारच्या फ्रिजमध्ये बर्फ साठत नाही.  तसेच साफ करण्यासाठी देखील हे सोपे असते. 

कोणता फ्रीज खरेदी करणे चांगले? 

जर आपण एकटे राहत असू किंवा आपले कुटुंब लहान असेल तर आपण डायरेक्ट कूल होणारे फ्रीज खरेदी करु शकतो. यात फ्रीजच्या मागील बाजूला जाळी असते. ज्यामुळे बिल कमी येते. जर आपल्याला जास्त प्रमाणात पदार्थ किंवा इतर गोष्टी साठवायच्या असतील तर जाळी नसलेला फ्रीज खरेदी करावा. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स