>सोशल वायरल > हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने चक्क मागच्या बाजूने अर्ध टक्कल केलं आहे. तिचा हा असला विचित्र हेअर कट पाहून चाहत्यांची मात्र झोप उडाली आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:45 PM2021-10-21T13:45:21+5:302021-10-21T13:46:07+5:30

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने चक्क मागच्या बाजूने अर्ध टक्कल केलं आहे. तिचा हा असला विचित्र हेअर कट पाहून चाहत्यांची मात्र झोप उडाली आहे. 

What's that, Shilpa Shetty is half bald! What hairstyle is this? | हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

हे काय भलतंच, शिल्पानी केलं अर्ध टक्कल! ही कुठली हेअरस्टाईल, काय हा मामला?

Next
Highlightsहे असं काही विचित्र करायचं असेल, तर जबरदस्त हिंमत लागते. शिल्पाने ही हिंमत दाखवली खरी, पण तिचे चाहते मात्र तिच्यावर जाम नाराज झाले आहेत.

स्त्री असो किंवा पुरूष हेअर कट करणं अगदीच नॉर्मल आहे. पण तुम्ही कसा हेअरकट करता आहात, याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही खूपच मस्त हेअर कट केला आणि त्यामुळे तुमचा लूक एकदम हटके झाला, तर लोक नक्कीच तुमच्याकडे वळून पाहतात आणि चांगल्या भावनेनी तुमच्या हेअर कटची चर्चा करतात. पण शिल्पा शेट्टीच्या बाबतीत मात्र सगळंच उलटं झालं आहे. तिने असा काही विचित्र हेअरकट केला आहे, की तिच्याकडे पाहताच तिचे फॅन्स चक्क डोळे झाकून घेत आहेत. 

 

'आतापर्यंत तर चांगली होती, आता मध्येच हे काय केलं या बयेनं?' अशा काही प्रतिक्रिया शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांनी तिचा हेअरकट पाहून दिल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे, की शिल्पा सध्या सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. ती फिटनेसविषयी किंवा मनाच्या शांतीविषयी तिच्या चाहत्यांना नेहमीच मोटीव्हेट करत असते. तिचे योगाचे फोटो आणि व्हिडियो पाहून तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शिल्पाचा एखादा फोटो किंवा व्हिडियो सोशल मिडियावर येताच तिच्या चाहत्यांच्या त्याच्यावर अक्षरश: उड्या पडत असतात. 

 

असाच एक व्हिडियो शिल्पाने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडियो पाहून तिच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. या व्हिडियोमध्ये शिल्पा पाठमोरी बसली असून तिचा हेअर कट सुरू आहे. हा हेअरकट एवढा विचित्र आहे, की त्यामध्ये एक व्यक्ती चक्क वस्तारा हातात घेऊन शिल्पाचे मागच्या बाजूने पुर्ण टक्कल करत आहे.

 

वरचे केस जसेच्या तसे मात्र मानेच्या वरच्या भागापासून ते चार ते पाच बोटे एवढ्या अंतरावरचे सगळेच  केस शिल्पाने पुर्णपणे भादरून टाकले आहेत. हा असा व्हिडियो पाहून ही अशी कशी शिल्पाची हेअर स्टाईल असं म्हणत चाहते चांगलेच गांगरून गेले आहेत. सध्या तिच्या या लूकची आणि हेअरकटची जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 

 

हे असं काही विचित्र करायचं असेल, तर जबरदस्त हिंमत लागते. शिल्पाने ही हिंमत दाखवली खरी, पण तिचे चाहते मात्र तिच्यावर जाम नाराज झाले आहेत. अनेकांनी तिच्या या हेअरकटची खिल्ली उडवली आहे. शिल्पाने हा हेअरकट केल्यानंतर Triabal Squats या व्यायामाचा व्हिडियोदेखील अपलोड केला आहे. बझ कट buzz cut असे शिल्पाच्या हेअर कटचे नाव आहे.  

 

Web Title: What's that, Shilpa Shetty is half bald! What hairstyle is this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

करिश्मा कपूरची कांजीवरम साडी विथ कलमकारी प्रिंट! कांजीवरम- कलमकारीचं पाहा देखणं मनमोहक फ्युजन.. - Marathi News | Karisma Kapoor's Kanjivaram Saree with Kalamkari Print! traditional kanjivaram with modern look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरची कांजीवरम साडी विथ कलमकारी प्रिंट! कांजीवरम- कलमकारीचं पाहा देखणं मनमोहक फ्युजन..

पारंपरिक डिझाईन्सच्या कांजीवरम साडी (Kanjivaram silk saree) आपण नेहमीच पाहतो... पण कांजीवरम साडीचं आणखी देखणं आणि माॅडर्न रूप पाहायचं असेल, तर करिश्मा कपूरच्या (actress Karisma Kapoor) साडीचे हे फोटो बघाच... ...

Viral Food Combinations : अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलाय का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस - Marathi News | Viral Food Combinations : Have you ever had bloody sugarcane juice video of making it going viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजबच आहे! लाल उसाचा रस कधी प्यायलात का? व्हायरल होतोय खुनी गन्ने का ज्यूस

Viral Food Combinations : व्हिडीओमध्ये दिसणारा उसाचा रस तुम्ही क्वचितच प्यायला असेल. त्याचे नाव ऐकताच अनेकजण घाबरले. ...

कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का?  - Marathi News | Katrina Kaif is on pre wedding diet plan.. what is her no carbs diet plan exactly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना कैफ करतेय प्री वेडिंग- नो कार्ब्ज डाएट; पण लग्नापूर्वी असं डाएट करावं का? 

Diet plan of Actress Katrina Kaif: कतरिना कैफ करतेय तसे नो कार्ब्ज (no carbs) किंवा लो कार्ब्ज (low carbs) डाएट अनेक जणी करतात, पण असे प्री वेडिंग डाएट करावे का? ...

Social Viral : जेसीबीतून काढली वरात, टाळ्यांच्या गजरात रॉयल एण्ट्री; जेसीबीनं मारली पलटी आणि.. - Marathi News | Social Viral : Couple uses excavator as seat at wedding reception falls | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेसीबी वाला भूल गया शादी का ऑर्डर है', जोडप्याला रॉयल एंट्री चांगलीच महागात पडली, पाहा व्हिडीओ

Social Viral : बहुतेकजण हे जोडपे मंचावर येण्याची कल्पना करत असताना, ही जोडी लाल रंगाच्या सॅटिन कापडाने सजलेल्या जड मशीनरीवरून खाली येताना दिसली. ...

Social Viral : लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं चपलेनं चोपचोप चोपला; पाहा व्हिडीओ - Marathi News | Social Viral : Man greets mother with flowers and card at airport gets chappal ki pitai viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं पाहताच चपलेनं चोप चोप चोपला; पाहा व्हिडीओ

Social Viral : 'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे.  ...

घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन - Marathi News | Celebrity parents come together for children, putting aside differences even after divorce; Aamir-Kiran, Hrithik-Suzan's sensible behavior | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन

आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव  (Kiran Rao)त्यांचा घटस्फोट झाल्यापासून खूपच चर्चेत आहेत. मुलगा आझाद याच्या वाढदिवसानिमित्त या चर्चेला आता पुन्हा एक वेगळं वळण मिळालं आहे.. ...